elon musk sold tesla shares worth 69 billion dollars after twitter poll
Elon Musk यांनी पुन्हा विकले टेस्लाचे कोट्यवधींचे शेअर्स; झाले मोठे नुकसान? किंमत पाहून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 10:36 PM1 / 9गेल्या काही दिवसांपासून टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख Elon Musk यांच्या कृतीची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण ट्विटरवर घेतलेल्या एका पोलनंतर एलन मस्क यांनी टेस्लामधील आपले कोट्यवधींचे शेअर्स विकले आहेत.2 / 9जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलन मस्क यांनी नेटकऱ्यांच्या कौलचा मान राखल्याची चर्चा जगभरात सुरू आहे. गेल्या आठवड्यात एलन मस्क यांनी ८ हजार १९० कोटी रुपयांचे शेअर्स म्हणजेच १.१ अब्ज डॉलरचे शेअर्स विकले होते. 3 / 9एलन मस्क यांनी पुन्हा एकदा टेस्ला कंपनीचे शेअर्स विकले आहेत. मस्क यांनी टेस्लाचे ८,९२६.५४ कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकले आहेत. जेव्हा मस्क यांनी कंपनीतील आपला १० टक्के हिस्सा विकण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांना समर्थन दिले. 4 / 9या प्रस्तावावर सुमारे ३५ लाखांहून अधिक मतांपैकी जवळपास ५८ टक्के लोकांनी त्यांना स्टॉक विकण्यास सांगितले. यानंतर एलन मस्क यांनी टेस्ला कंपनीमधील आपले शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. 5 / 9टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी आतापर्यंत ६.९ अब्ज डॉलर किमतीचे इलेक्ट्रिक कारचे शेअर्स विकले आहेत. मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण संपत्ती २८५ अब्ज डॉलर आहे. 6 / 9एलन मस्क ३०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडणारे जगातील आणि इतिहासातील पहिले व्यक्ती ठरले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत ८.०७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. २०२१ मध्ये आतापर्यंत त्यांची संपत्ती ११६ अब्ज डॉलरने वाढली आहे.7 / 9मस्क यांची बहुतेक संपत्ती टेस्लाच्या शेअर्समध्ये आहे, ज्यामुळे त्यांना रोखीने पगार मिळत नाही. ३०० अब्ज डॉलर संपत्तीचा मालक असलेल्या मस्क यांनी सांगितले की, त्यांनी स्टॉक विकण्याचा प्रस्ताव दिला, कारण काही डेमोक्रॅट अब्जाधीशांवर कर भरण्यासाठी दबाव टाकत आहेत.8 / 9अनरियलाइज्ड गेन (अवास्तव लाभ) ज्याला अब्जाधीश कर म्हणूनही ओळखले जाते, त्याला जो बिडेन यांच्या बजेटमधून वगळण्यात आले होते, त्यावर सध्या वाटाघाटी सुरू आहेत.9 / 9शेअर विक्रीच्या बातम्यांमुळे टेस्लाचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टेस्लाचा स्टॉक एका आठवड्यात १५.४ टक्क्यांनी घसरला आहे. शेवटच्या व्यापारात टेस्लाचा शेअर २.८ टक्क्यांनी घसरला आणि १०३३.४२ डॉलरवर बंद झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications