शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhaar Card मध्ये करा 'हे' छोटं काम, कुठे वापर होतोय लगेच माहित पडेल; फसवणुकीपासून वाचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 8:30 AM

1 / 7
आधार कार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवजापैकी एक आहे. त्यात तुमची सर्व बायोमेट्रिक माहिती साठवलेली असते. त्यामुळे जर ते चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडलं तर त्याचा गैरवापर तुमचं मोठं नुकसान करू शकतो.
2 / 7
अनेकवेळा तुमच्या आधार कार्डचा तुमच्या पाठीमागे गैरवापर होत असतो आणि तुम्हाला त्याची जाणीवही नसते. जर तुम्हाला हे टाळायचं असेल तर तुम्ही एक छोटीशी गोष्ट करून स्वतःचं संरक्षण करू शकता. तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या ईमेल आयडीसोबत लिंक करू शकता.
3 / 7
तुमचं आधार तुमच्या ईमेल आयडीशी लिंक केल्यानं तुम्हाला असा फायदा मिळेल की जेव्हा कोणी तुमचा आधार वापरेल तेव्हा तुम्हाला त्याची माहिती मिळत राहील. हे तुम्हाला नकळत कोणत्याही गुन्ह्यात सहभागी होण्यापासून वाचवेल. तसंच, तुमच्या बँक खात्याशीही कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.
4 / 7
UIDAI नुसार, जर तुम्हाला तुमचा आधार तुमच्या ईमेल आयडीशी लिंक करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार केंद्रावर जावं लागेल. आजकाल तुम्हाला प्रत्येक शहरात आधार केंद्रे दिसतील. या केंद्रांवर आधारशी संबंधित सर्व प्रकारची कामं केली जातात. या केंद्रांना भेट देऊन तुम्ही आधारशी ईमेलशी लिंक करण्याचे काम पूर्ण करू शकता.
5 / 7
दरम्यान, ज्या लोकांचं आधार कार्ड नवीन आहे त्यांना त्याची गरज भासणार नाही कारण त्यांचं आधार आधीच ईमेलशी लिंक केलेलं असेल. पण ज्यांचं आधार जुनं आहे त्यांना याची गरज भासू शकते. ईमेल आयडी लिंक केल्यानंतर, कोणीही तुमच्या आधार कार्डचा गैरवापर करू शकणार नाही.
6 / 7
तुम्ही तुमचं आधार नेहमी अपडेट ठेवलं पाहिजे. तुमच्या घराचा पत्ता बदलला असल्यास, तुम्ही तो फक्त ऑनलाइन अपडेट करू शकता. मात्र यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक करणं आवश्यक आहे.
7 / 7
जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन अपडेट करू शकता. तुमचा मोबाईल नंबर अपडेट असेल तर तुमचा पत्ता घरी बसून ऑनलाईन अपडेट करता येईल. यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती भरावी लागेल. यासाठी तुम्हाला काही फीदेखील भरावी लागेल.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डbusinessव्यवसाय