For the first time in 46 years, the interest rate on PPF can be less than 7 percent!
46 वर्षांनंतर पहिल्यांदाच PPF वरील व्याजदर होऊ शकतो 7 टक्क्यांपेक्षा कमी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 7:27 PM1 / 10नवी दिल्ली - कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार पुन्हा एकदा लहान बचत योजनांवरील व्याजदर कमी करू शकते. त्याअंतर्गत पीपीएफ (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) मध्येही कपात केली जाऊ शकते. 2 / 10मीडिया रिपोर्टनुसार, कपात केल्यास पीपीएफवरील व्याज 7 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकते, जे 46 वर्षातील सर्वात कमी असणार आहे. यापूर्वी 1974 मध्ये पीपीएफवरील व्याज दर 7 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता.3 / 10केंद्र सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी पीपीएफमध्ये किमान ठेवीची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढविली आहे. याआधी ही अंतिम मुदत 31 मार्च 2020 होती. या महिन्याच्या अखेरीस आपण किमान 500 रुपये जमा न केल्यास आपल्यास दंड होऊ शकतो.4 / 10पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या योजनांच्या व्याज दरात सुद्धा एप्रिलमध्ये घट झाली आहे. पीपीएफ दर एप्रिलमध्ये 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर आला आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा दर 8.6 टक्क्यांवरून 7.4 टक्के करण्यात आला. 5 / 10राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) दर 7.9 टक्क्यांवरून 6.8 टक्के व सुकन्या समृद्धी खाते योजनेच्या व्याज दरात 8.4 टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांपर्यंत घट करण्यात आली आहे.6 / 10एप्रिलमध्ये व्याजदरात मोठी घट झाली होती. 1 एप्रिलपासून 10 वर्षांच्या बाँडची यील्ड सरासरी 6.07 टक्के राहिली आहे. आता ही 5.85 टक्के आहे. यावरून छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी करता येऊ शकतात, हे स्पष्ट संकेत आहेत. 7 / 10यामागील मुख्य कारण म्हणजे बाँड यील्डमध्ये सतत होणारी घट असल्याचे सांगण्यात येते. याचा अर्थ लहान बचत योजनांचे व्याज दर कमी करता येऊ शकतात. त्यांचा व्याज दर प्रत्येक तिमाहीत निश्चित केला जातो. पुढच्या आठवड्यात व्याज दरात बदल होण्याची शक्यता आहे.8 / 10व्याज दर कपात केल्यास 1974 नंतर प्रथमच पीपीएफचा व्याज दर 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल. छोट्या बचत योजनांचे व्याज दर सरकारच्या बाँड यील्डशी लिंक होत आहेत. पीपीएफचा दर 10 वर्षांच्या सरकारच्या बाँड यील्डशी लिंक आहे. एप्रिल ते जून या तिमाहीचा पीपीएफ व्याज दर 7.1 टक्के ठेवण्यात आला होता.9 / 10एप्रिलमध्ये व्याजदरात मोठी घट झाली होती. 1 एप्रिलपासून 10 वर्षांच्या बाँडची यील्ड सरासरी 6.07 टक्के राहिली आहे. आता ही 5.85 टक्के आहे. यावरून छोट्या बचत योजनांचे व्याज दर कमी करता येऊ शकतात, हे स्पष्ट संकेत आहेत. 10 / 10दर कपातीपूर्वी खरेदी केलेल्या एनएससी आणि केव्हीपीवर मॅच्युरिटीपर्यंत कॉन्ट्रॅक्टच्या दराने व्याज मिळत राहील. मात्र, पीपीएफ आणि सुकन्या योजनेच्या गुंतवणुकीवर परिणाम होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications