वीजबिल, रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीपासून RBIच्या नियमांपर्यंत, आजपासून होणार हे १० बदल, थेट होणार तुमच्या खिशावर परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 09:43 AM 2022-10-01T09:43:03+5:30 2022-10-01T09:49:50+5:30
New Rules from 1st October: आजपासून देशभरात अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल कोणते आहेत. त्यांचा आढावा आणि यादी पुढीलप्रमाणे. आजपासून देशभरात अनेक नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल कोणते आहेत. त्यांचा आढावा आणि यादी पुढीलप्रमाणे.
दिल्लीत बंद होणार मोफत वीज दिल्लीमध्ये मोफत विजेची सुविधा घेण्यासाठीचा नियम आता बदलला आहे. विजेच्या बिलावर दिल्ली सरकारकडून मिळणारी सब्सिडी ३० सप्टेंबरपासून बंद झाली आहे. आता ही सब्सिडी मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुंबईत रिक्षा टॅक्सी भाडेवाढ आजपासून मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागला आहे. आता मुंबईत रिक्षा प्रवासासाठी दोन तर टॅक्सी प्रवासासाठी ३ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. त्यामुळे रिक्षा प्रवासासाठी २३ रुपये तर टॅक्सीसाठी २८ रुपये मोजावे लागणार आहेत.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियम आजपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डसंबंधिचे नियम बदलले आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबरपासून टोकनायझेशन सिस्टिममध्ये बदल केल्यानंतर कार्डधारकांना पेमेंट करताना वेगळा अनुभव मिळेल. त्यामुळे आधीच्या तुलनेत डेबिट आणि क्रेडिट कार्डने ट्रान्झॅक्शन करणे अधिक सुरक्षित होणार आहे.
म्युच्युअल फंडच्या नियमांमध्ये होणार बदल आजपासून म्युच्युअल फंडच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नॉमिनेशन डिटेल द्यावी लागेल. असे न केल्यास एक डिक्लेरेशन भरावे लागेल. त्यामध्ये नॉमिनेशनची सुविधा न घेण्याची घोषणा केली पाहिजे.
अटल पेन्शन योजनेमध्ये बदल सरकारने अटल पेन्शन योजनेमध्येही बदल केला आहे. टॅक्सपेयर्स आता याचा फायदा उचलू शकणार नाहीत. म्हणजेस जर तुम्ही प्राप्तीकराच्या चौकटीत येत असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाा मिळणार नाही.
डीमॅट खात्याच्या नियमांमध्ये होणार बदल तुमचं डीमॅट अकाऊंत आता आधीच्यापेक्षा अधिक सुरक्षित असेल. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निर्णयानुसार ३० सप्टेंबरपर्यंत डीमॅट अकाऊंटमध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करणं आवश्यक असेल. तसे न केल्यास आजपासून डीमॅट अकाऊंटमध्ये युझर्स लॉगइन करू शकणार नाहीत.
ट्रेनच्या नियमांमध्ये बदल जर तुम्ही ट्रेनमधून कुठे प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. आजपासून भारतीय रेल्वेने अनेक ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे.
५जी सेवेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशामध्ये बहुप्रतीक्षित ५जी सेवेची सुरुवात करणार आहेत. एका सरकारी माहितीनुसार पंतप्रधान देशातील काही मोजक्या शहरांमध्ये आजपासून ५जी सेवेची सुरुवात करतील. त्यानंतर पुढच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण देशात ५जी सेवेचा विस्तार केला जाईल.
फॉक्सवॅगनच्या कार महागणार कार निर्माता कंपनी फॉक्सवॅगनच्या कार आजपासून महागणार आहेत. किमतींमधील बदल तुम्हाला कंपनीच्या कोटेशनमध्ये दिसतील. कंपनीच्या सीनियर अधिकाऱ्यांनी १ ऑक्टोबरपासून कारच्या किमतीमध्ये २ टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्याचे सांगितले होते.
स्मॉल सेव्हिंग स्कीमवरील व्याज सरकारकडून स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजाच्या दराचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. यावेळी व्याजदरांना वाढवणे आणि कमी करण्याबाबत निर्णय केला जातो. वित्तमंत्रालयाकडून हे व्याजदर ठरवले जातात. आताचा आढावा हा ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांसाठी घेतला जाणार आहे. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, सीनिय सिटिझन्स सेव्हिंग स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स यांचा समावेश आहे.