gautam adani net worth huge decline adani group shares fall continue on fifth consecutive day
Adani Group ला मोठा फटका; ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान! By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 4:12 PM1 / 13गेल्या सोमवारी अदानी समूहाबाबत एक वृत्त आले आणि सलग पाचही दिवस अदानी समूहातील विविध कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले.2 / 13अदानी समूहातील विविध कंपन्यांचे मोठे नुकसान झाले असून, याचा फटका गौतम अदानी यांनाही बसला आहे. आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांची घसरण झाली आहे. 3 / 13 तर दुसरीकडे अदानी समूहातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनाही याची झळ बसली असून, आठवडाभरात त्यांचे तब्बल २ लाख कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. 4 / 13सोमवारपासून अदानी समूहातील शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे. सलग पाच सत्रात गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. 5 / 13गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. या प्रकरणी एनएसडीएलकडून स्पष्टीकरण देण्यात आले असले तरी अदानी समूहातील शेअरमधील घसरण थांबलेली नाही.6 / 13अदानी एन्टरप्राइजेस आणि अदानी पोर्ट हे दोन शेअर वगळता अदानी समूहातील इतर चार शेअर्सला झळ बसली असून, अदानी ग्रीनच्या शेअरमध्ये ४.५४ टक्के घसरण झाली. तो १०६२.७५ रुपयांवर बंद झाला. अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये आज ५ टक्के घसरण झाली आहे. 7 / 13कंपनीचा शेअर १२५८.१० रुपयांवर स्थिरावला. अदानी ट्रान्समिशनचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला असून तो १२३५.९० रुपयांवर बंद झाला. अदानी पॉवरच्या शेअरमध्ये ५ टक्के घसरण झाली आणि तो ११४.९० रुपयांवर बंद झाला.8 / 13अदानी समूहातील पडझडीने मिडकॅप इंडेक्सला देखील मोठी झळ बसली आहे. मात्र, अदानी एन्टरप्राइजेसमध्ये ८.७६ टक्के वाढ झाली आहे. अदानी एन्टरप्राइजेसचा शेअर १४८७.८५ रुपयांवर बंद झाला. 9 / 13अदानी पोर्टच्या शेअरमध्ये ७ टक्के वाढ झाली आणि तो ६९४.६० रुपयांवर बंद झाला. अदानी समूहातील दोन कंपन्यांचे शेअर्स सावरल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे.10 / 13अदानी समूहाच्या शेअरमध्ये अनिश्चितता वाढल्याने किरकोळ गुंतवणूकदारांनी या शेअरपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. काही शेअरमध्ये दररोज लोअर सर्किट लागत असल्याने किरकोळ गुंतवणूकदारांची मात्र कोंडी झाली आहे.11 / 13अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. Bloomberg Billionaires Index नुसार गेल्या चार दिवसांमध्ये त्यांच्या नेटवर्थमध्ये १३.२ अब्ज डॉलर्सची म्हणजेच ९७,८५२ कोटी रूपयांची घसरण झाली आहे.12 / 13गौतम अदानी यांच्या नेटवर्थमध्ये जितक्या तेजीने वाढ झाली होती, तितक्याच तेजीने ती आता कमी होताना दिसत आहे. या आठवड्यात अन्य अब्जाधिशांच्या तुलनेत अदानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घसरण झाली आहे.13 / 13काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्यापेक्षा एकच पायरी दूर होते. तसंच त्यावेळी ते लवकरच अंबानी यांना मागे सारतील असे चित्र निर्माण झाले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications