get a loan of Rs 2 lakh from Paytm in two minutes
Paytm वरुन दोन मिनिटांत मिळवा २ लाखांचं कर्ज; कसं? जाणून घ्या... By मोरेश्वर येरम | Published: January 6, 2021 10:08 PM2021-01-06T22:08:48+5:302021-01-06T22:17:10+5:30Join usJoin usNext केवळ दोन मिनिटांत २ लाख रुपयांपर्यंतंच कर्ज मिळवता येऊ शकतं. दोन मिनिटांत मॅगी तयार करण्याचा दावा केल्याचं आपण आजवर पाहिलं असेल. पण आता डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता केवळ दोन मिनिटांत २ लाख रुपयांपर्यंतंच कर्ज देखील मिळवता येऊ शकतं. देशातील बहुचर्चित डिजिटल पेमेंस सुविधा देणाऱ्या पेटीएमने (Paytm) इन्स्टंट पर्सनल लोन सुविधा सुरु केली आहे. 'पेटीएम'च्या या सुविधेचा तुम्हाला कधीही आणि कोणत्याही दिवशी लाभ घेता येऊ शकतो. म्हणजेच वर्षाच्या ३६५ दिवसांमध्ये तुम्ही हवं त्या दिवशी कर्ज घेऊ शकता. पेटीएमच्या या सुविधेमार्फत तुम्हाला अवघ्या दोन मिनिटांत कर्ज मिळू शकतं. तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि शॉपिंग पॅटर्नच्या आधारावर हे कर्ज मिळू शकतं. पेटीएमच्या माहितीनुसार ग्राहकांना कर्जाची रक्कम चुकती करण्यासाठी १८ ते ३६ महिन्यांना कालावधी देण्यात येतो. पेटीएमने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांसोबत करार केला आहे. त्यामुळे नोकरदार, छोटे व्यावसायिक आणि इतर लघुउद्योजकांना सहजपणे कर्ज मिळवता येऊ शकतं. देशातील ज्या भागात बँकिंग सुविधा पोहोचलेली नाही. अशा ठिकाणी पोहोचून छोट्या शहरातील सामन्य नागरिकांनाही कर्ज घेता येईल यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कर्ज घेऊ इच्छितांना पेटीएमच्या काही आवश्यक गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. कर्ज मिळवण्यासाठी पेटीएम अॅपमध्ये फायनान्शिअल सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन पर्सनल लोन टॅबवर क्लिक करावं लागेल. पर्सनल लोन सेक्शनमध्ये गेल्यानंतर पेटीएमकडून विचारण्यात येणाऱ्या सर्व प्रश्नांची माहिती देऊन कर्ज प्राप्त करता येणार आहे. पेटीएममध्ये बिटा व्हर्जनमध्ये सुरुवातीला निवडक ४०० ग्राहकांना कर्ज उपलब्ध करुन दिलं आहे. आपल्या तात्काळ आर्थिक गरजांसाठी पेटीएमची ही सुविधा अतिशय उपयुक्त ठरेल, असं कंपनीचे कर्ज विभागाचे सीईओ भावेश गुप्ता यांनी सांगितलं. अनेक गावखेड्यांमध्ये बँकिंग सुविधेतून कर्ज मिळवणं सहजशक्य होत नसल्यानं पेटीएमची या सुविधेतून घरबसल्या कर्ज प्राप्त करता येणार असल्याचंही ते म्हणाले. टॅग्स :पे-टीएमव्यवसायबँकPaytmbusinessbank