Gold: Before buying gold for Dussehra, find out how much gold you can keep in your house
Gold: दसऱ्याला सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुम्ही घरामध्ये किती सोनं ठेवू शकता? By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 7:05 AM1 / 7भारतीयांना सोन्याचे जबरदस्त आकर्षण असले तरी घरात असलेल्या सोन्याचा हिशेब व ते खरेदी करण्यासाठी वापरलेल्या पैशाचा स्रोत कायदेशीर असणे आवश्यक आहे. तुमच्या घरातील सोन्याच्या खरेदीसाठी लागलेला पैसा कुठून आणला, हे तुम्हाला सांगता आले नाही, तर तुमचे सोने जप्त होऊ शकते. 2 / 7सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून अनेक जण सोने खरेदीला प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांत सोन्याचे दरही गगनाला भिडल्याने या सोन्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने सोने खरेदी, गुंतवणूक आणि त्याच्या साठवणुकीबाबत काही नवे नियम केले आहेत. 3 / 7या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. वास्तविक घरात सोने साठवण्यावर कोणतीही मर्यादा नाही. कायदेशीर मार्गाने खरेदी केलेले कितीही सोने नागरिक आपल्या घरात ठेवू शकतात. फक्त त्याचे पुरावे खरेदीदाराकडे असायला हवेत. 4 / 7केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीडीटी) माहितीनुसार, नागरिक आपल्या घरात सोन्याचे कितीही दागिने बाळगू शकतात. मात्र, प्राप्तिकर विभागाकडून घरातील किंवा बँकेच्या लॉकरमधील सोन्याची तपासणी होऊ शकते. अशा तपासणीच्या वेळी सोन्याचा स्रोत तुम्हाला पुराव्यांसह सांगता आला पाहिजे5 / 7प्राप्तिकर विभागाच्या नियमानुसार, तुमच्या घरात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने असतील तर प्राप्तिकर विवरणपत्रात (इन्कम टॅक्स रिटर्न) ते नमूद करणे बंधनकारक आहे. लग्न झालेल्या स्त्रीला घरात ५०० ग्रॅम दागिने ठेवण्याची मुभा आहे. अविवाहित स्त्री घरात २५० ग्रॅम दागिने ठेवू शकते. 6 / 7पुरुषांना घरात १०० ग्रॅम सोने बाळगण्याची मुभा आहे. या सोन्याच्या विक्रीवर भांडवली कर भरावा लागतो. काय सांगतो प्राप्तिकर कायदा? प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम १३२ नुसार तपासादरम्यान एखादी व्यक्ती आपल्याकडील मौल्यवान वस्तू किंवा दागिने यासंदर्भात योग्य माहिती देऊ शकली नाही, अथवा उत्पन्नाचे योग्य स्रोत दाखवू शकला नाही, तर त्या वस्तू प्राप्तिकर अधिकारी जप्त करू शकतात. 7 / 7प्राप्तिकराशी निगडित कोणत्याही प्रकरणात जर संबंधित व्यक्तीने मागील वर्षी भरलेले प्राप्तिकर विवरणपत्र हे विकत घेतलेल्या सोन्याच्या किमतीशी मेळ खात नसेल, तर प्राप्तिकर अधिकारी सोन्याचे दागिने किंवा मूल्यवान वस्तू जप्त करू शकतात. पण, एका विशिष्ट मर्यादेच्या खालील किमतीचे सोन्याचे दागिने प्राप्तिकर अधिकारी जप्त करू शकत नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications