शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gold Hallmarking: आता ‘असा’ समजणार खऱ्या आणि खोट्या सोन्यातील फरक; कशी पटवाल शुद्धतेची ओळख?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 4:17 PM

1 / 12
देशात सोन्याच्या भाव गेल्या अनेक दिवसांपासून चढ, उतार होताना पाहायला मिळत आहे. देशात गोल्ड हॉलमार्किंगचा अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
2 / 12
सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात आलं आहे. या नियमाचा ढाचा दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे तो लागू करण्यात आला नव्हता.
3 / 12
दुकानदारानं तुमची फसवणूक केल्यास ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी बीआयएसच्या मोबाईल ऍप किंवा तक्रार नोंदणी पोर्टलचा वापर करू शकता.
4 / 12
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या सोन्यावर, ते किती कॅरेटचे सोने आहे, हे लिहिलेले असेल. बीआयएसनुसर, अनिवार्य हॉलमार्किंगमुळे सामान्य ग्राहकांना फायदा होईल.
5 / 12
यामुळे ग्राहकांना सोन्याचे दागिने खरेदी करताना कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही. तसेच त्यांना दागिन्यांवर लिहिलेल्या शुद्धतेनुसारच दागिने मिळतील.
6 / 12
मात्र, तुमच्याकडील सोने खरे आहे का, याची खात्री पटवण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगितल्या गेल्या आहेत. याशिवाय ग्राहकांना सोनं खरेदी करणे आणि सोनं ओळखण्यासाठी अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.
7 / 12
बीआयएस-केअर असे या अॅपचे नाव आहे. याच्या मदतीने आपण उत्पादनाची गुणवत्ता तपासू शकता. यासह आपण उत्पादनाविषयी तक्रार देखील दाखल करू शकता जे अस्सल नाही. हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
8 / 12
Android वापरकर्ते Google Play Store वरून बीआयएस-केअर अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, आपल्याला अ‍ॅपमध्ये नोंदणी करावी लागेल. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे.
9 / 12
सर्वप्रथम अ‍ॅप उघडा आणि आपले नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी द्या. यानंतर, ओटीपीद्वारे ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर सत्यापित करा.
10 / 12
आपण उत्पादनाची गुणवत्ता, आयएसआय मार्कचा दुरुपयोग, हॉलमार्क, नोंदणी चिन्ह चुकीच्या पद्धतीने आणण्यासाठी जाहिराती आणि बीआयएसशी संबंधित मुद्द्यांवर देखील तक्रार करू शकता.
11 / 12
गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे सोन्याच्या शुद्धतेचे एक प्रमाणपत्र आहे. बहुतांश ज्वेलर्सच्या दुकानाता यापुढे १४ कॅरेट, १८ कॅरेट आणि २२ कॅरेटचे सोने उपलब्ध होऊ शकणार आहे. देशभरात जवळपास ४ लाख ज्वेलर्स असून, यांपैकी ३५,८७९ बीआयएस सर्टिफाइड आहेत.
12 / 12
सध्या केवळ ४० टक्के ज्वेलरीचे हॉलमार्किंग झालेले आहे. ज्वेलर्सच्या सोयीसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ऑनलाइन आणि सुलभ करण्यात आली आहे. कुठलाही ज्वेलर हॉलमार्किंग शिवाय सोने विकताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
टॅग्स :Goldसोनं