Gold Rate Today: सुर्वणसंधी! सोन्याचा सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी दर, काय आहे आजचा भाव?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:26 PM2021-09-26T12:26:06+5:302021-09-28T15:45:17+5:30

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,२४० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,२४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,२४० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४६,२४० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४४,४४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,५८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,२४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,२४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५९९ रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला 4.9375 ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.