शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सरकार देतंय स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 4:15 PM

1 / 10
सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21चा (Sovereign Gold Bond Scheme) तिसरा टप्पा येत्या सोमवारपासून म्हणजेच 8 जूनपासून खरेदीसाठी (सब्सक्रिप्शन) सुरू होणार आहे.
2 / 10
केंद्र सरकार 20 एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम लागू करेल, असे सांगण्यात येत होते. दरम्यान, सरकारच्या वतीने आरबीआयकडून 2020-21ची सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम जारी करण्यात येईल.
3 / 10
आरबीआयने तिसर्‍या टप्प्यातील गोल्ड बाँडसाठी 4,677 रुपये प्रति ग्रॅम किंमत निश्चित केली आहे. आरबीआयने म्हटले आहे की, 'सब्सक्रिप्शनचा कालावधीपूर्वी तीन व्यापारी सत्रामध्ये (3 जून ते 5 जून 2020) 24 कॅरेट सोन्याच्या क्लोजिंग किंमतीच्या सरासरीच्या आधारे बाँडची नॉमिनल किंमत 4,677 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली गेली आहे.'
4 / 10
जे लोक सॉव्हरेन गोल्ड बाँडसाठी डिजिटल पद्धतीने अर्ज आणि पैसे भरणार आहेत. त्यांच्यासाठी प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळणार आहे.
5 / 10
अशा गुंतवणूकदारांसाठी सॉव्हरेन गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 4,627 रुपये असणार आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.
6 / 10
सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीममध्ये आठ वर्षापर्यंत ही गुंतवणूक असते. तसेच, पाच वर्ष पूर्ण झाल्यावर ग्राहक या स्कीममधून बाहेर पडू शकतील.
7 / 10
भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंबं, ट्रस्ट, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या सॉव्हरेन गोल्ड बाँडची खरेदी करू शकतात.
8 / 10
सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम अंतर्गत एखादी व्यक्ती किमान एक ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. आर्थिक वर्षात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त चार किलोग्रॅमपर्यंत सोन्याचे बाँड खरेदी करू शकते.
9 / 10
याचबरोबर, अविभाजित हिंदू कुटुंब जास्तीत जास्त चार किलो सोन्याचे बाँड खरेदी करू शकते. तसेच, एखादे ट्रस्ट 20 किलोग्रॅम पर्यंतचे सोन्याचे बाँड खरेदी करु शकते.
10 / 10
दरम्यान, सॉव्हरेन गोल्ड बाँड स्कीम म्हणजेच नागरिकांना प्रत्यक्ष सोन्याचे वस्तूऐवजी बाँडमध्ये पैसे गुंतवता येणार आहेत. यामुळे तुम्ही घरबसल्या गुंतवणूक करू शकाल तसेच व्यवसायात सुद्धा वृद्धी येईल अशी अपेक्षा आहे.
टॅग्स :GoldसोनंReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक