शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिटेल एफडीवर अधिक व्याज देणाऱ्या 'या' आहेत टॉप ५ बँका; जाणून घ्या माहिती

By जयदीप दाभोळकर | Published: January 08, 2021 5:49 PM

1 / 12
गुंतवणूक करण्यासाठी एफडी हा चांगला पर्याय मानला जातो. एफडीमधील गुंतवणुकही सुरक्षित मानली जाते. यामध्ये रिटर्नही उत्तम मिळतात. बचत खात्याच्या तुलनेत एफडीवर गुंतवणुकदारांना व्याजही चांगलं दिलं जातं.
2 / 12
प्रत्येक बँकेमध्ये एफडीचे व्याजदरही वेगवेगळे असतात. ज्येष्ठ नागरिकांना बँकांकडून एफडीवर सामान्य नागरिकांच्या तुलनेत अधिक व्याज दिलं जातं. जाणून घेऊया कोणत्या आहे प्रमुख पाच बँका ज्यात एफडीवर व्याज जास्त मिळतं.
3 / 12
स्टेट बँकेत ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर २.९ टक्के व्याज दिलं जातं. तर ४६ ते १७९ दिवसांसाठी ३.९ टक्के व्याज देण्यात येतं. तर दुसरीकडे १८० दिवस ते १ वर्षापर्यंतच्या एफडीसाठी बँक ४.४ टक्के व्याज देते.
4 / 12
याचप्रमाणे स्टेट बँक १ ते २ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ४.९ टक्के, २ ते ३ वर्षांच्या कालावधीच्या एफडीसाठी ५.१ टक्के व्याज देते. तर ३ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी बँकेकडून ५.३ टक्के व्याज देण्यात येत. तर ५ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर ५.४ टक्के व्याज मिळतं. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकाना स्टेट बँक प्रत्येक कालावधीसाठी ०.५ टक्के सामान्यांपेक्षा अधिक व्याज देते.
5 / 12
पंजाब नॅशनल बँक एफडीवर ७ ते ४५ दिवसांकरिता ३ टक्के व्याज देते. तर सध्या बँकेकडून एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी ४.५ टक्के व्याज दिलं जातं.
6 / 12
१ ते ३ वर्षांसाठी एफडीवर बँक ५.२ टक्के तर ५ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर बँकेककडून ५.२५ टक्के व्याज देण्यात येतं.
7 / 12
एचडीएफसी बँकेत ७ ते २९ दिवसांपर्यंतच्या एफडीवर २.५ टक्के व्याज मिळतं. तर ३० ते ९० दिवसांच्या एफडीवर ३ टक्के व्याज देण्यात येतं. ९१ ते ६ महिन्यांच्या कालावधीसाठी बँक ४.४ टक्के इतकं व्याज देते.
8 / 12
१ वर्ष ते २ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीवर बँक ४.९ टक्के, २ ते ३ वर्षांच्या कालावधीसाठी ५.१५ टक्के, ३ ते ५ वर्षांच्या कालावधीसाठी ५.३० टक्के आणि ५ ते १० वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर बँक ५.५ टक्के व्याज देते.
9 / 12
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ७ ते ४५ दिवसांकरिताच्या एफडीवर २.८ टक्के व्याज देते. तर ४६ ते १८० दिवसांकरिता ३.७० टक्के व्याज देण्यात येतं. याव्यतिरिक्त १८१ दिवस ते ७० दिवसांपर्यंत आणि २७० दिवसांपासून एका वर्षांपर्यंत अनुक्रमे ४.३० टक्के आणि ४.४० टक्के व्याज मिळतं.
10 / 12
१ वर्षाच्या मॅच्युरिटी पिरिअडवर बँक ५ टक्के व्याज देत आहे. तर १ वर्षापासून २ वर्षापर्यंत ५ टक्के आणि २ ते ३ वर्षांपर्यंत ५.१० टक्के आणि ३ ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर ५.२५ टक्के व्याज देण्यात येत आहे.
11 / 12
कॅनरा बँकेत ग्राहकांना ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवर २.९५ टक्के व्याज देण्यात येतं. तर ४६ ते ९० दिवसांपर्यंत आणि १८० ते १ वर्षांपर्यंत अनुक्रमे ३.९० टक्के आणि ४.४५ टक्के व्याज मिळतं.
12 / 12
१ वर्षाच्या मॅच्युरिटीवर बँक ५.२५ टक्के व्याज देतं. तर एका वर्षापेक्षा अधिक ते २ वर्षांच्या कालावधीसाठी आणि ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीपर्यंत बँक एफडीवर ५.४० टक्के व्याज देते. ३ वर्षांपेक्षा अधिक ते १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँकेकडून ५.५ टक्के व्याज दिलं जातं.
टॅग्स :MONEYपैसाbankबँकState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकhdfc bankएचडीएफसी