Ice cream parlors to attract 18 percent and cloud kitchens 5 percent GST said CBIC
GST On Ice Cream : आता आईस्क्रीमही महागलं; पार्लरमध्ये विक्री होणाऱ्या Ice Cream वर १८ टक्के GST लागणार By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 8:56 AM1 / 8एकीकडे सातत्यानं पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅल, भाजीपाला, डाळी अशांचे दर वाढत असताना दुसरीकडे आता आईस्क्रीम प्रेमींचीही निराशा होणार आहे. पार्लर किंवा कोणत्याही प्रकारच्या दुकानांमध्ये विक्री करण्यात येणाऱ्या आईस्क्रीमवर आता १८ टक्के जीएसटी (18 percent gst on ice cream) आकारला जाणार आहे. 2 / 8सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्सनं (CBIC) बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. पार्लर अथवा दुकानांमध्ये विक्री होणाऱ्या आईस्क्रीमवर १८ चक्के जीएसटी लावण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. 3 / 8याशिवाय सीबीआयसीनं २१ वस्तू आणि सेवांशी निगडीत दरांमध्ये बदलांवर व्यापार आणि उद्योग समूहाद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट केली. याचा निर्णय १७ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ४५ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला होता. 4 / 8आईस्क्रीम पार्लरबद्दल बोलताना सीहीआयसीनं म्हटलं की असं स्थान पहिल्यापासून आईस्क्रीमची विक्री करतात आणि ते रेस्तराँ प्रमाणे नसतात. 5 / 8'आईस्क्रीम पार्लर कोणत्याही प्रकारच्या जेवण तयार करण्याच्या रुपात संलग्न नसतात. तर दुसरीकडे रेस्तराँ सेवा देताना अन्नपदार्थ शिजवणं किंवा तयारी करण्याच्या कामात सामील असतात,' असंही यावेळी सांगण्यात आलं. 6 / 8बोर्डाने स्पष्ट केलं की त्यांच्या क्रियाकलापांमध्ये यात काही घटक उपस्थित असूनही सेवा म्हणून नव्हे तर एक वस्तू (उत्पादित वस्तू) म्हणून आईस्क्रीमचा पुरवठा होतो. त्यामुळे यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.7 / 8यापूर्वी काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं होते की आइस्क्रीम पार्लरमध्ये विकलं जाणारे आईस्क्रीम रेस्तराँ सेवांखाली समाविष्ट केले जाईल (मोठ्या प्रमाणात ऑर्डरमध्ये विक्री होत असलेलं आईस्क्रीम वगळता) आणि म्हणून ५ टक्के जीएसटी दर आकारला जाईल, असं ईव्हायई टॅक्स पार्टनर अभिषेक जैन यांनी सांगितलं. 8 / 8आता परिपत्रकात अशी तरतूद करण्यात आली आहे की आइसक्रीम पार्लर आधीच तयार केलेले आइस्क्रीमची विक्री करतात. त्यामुळे त्यांच्यावर रेस्तराँच्या बाबी लागू होत नाहीत आणि त्यानुसार १८ टक्के (आयटीसीसह) जीएसटी लागू होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications