शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Home Loan: 'होमलोन' घेताय मग 'या' महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या, मग नाही येणार घर लिलावाची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 2:03 PM

1 / 7
जर तुम्ही घर खरेदीसोबतच इतर प्रकारचे कर्ज घेतले असेल तर तुम्हाला बँकेकडून घेतलेले कर्ज फेडावे लागेल कारण जर तुम्ही बँकेचे कर्ज फेडले नाही तर तुम्हाला लिलावाला सामोरे जावे लागू शकते. यासोबतच तुम्हाला अनेक आव्हानांचाही सामना करावा लागतो.
2 / 7
जेव्हाही तुम्ही घर खरेदी करता किंवा बांधता तेव्हा तुम्ही गृहकर्ज घेता, त्याचप्रमाणे तुम्ही कार खरेदी करताना कार लोन घेता, इ. अशी कर्जे सुरक्षित कर्ज म्हणून वर्गीकृत केली जातात कारण त्यांच्या बदल्यात, तुम्हाला काही मालमत्ता बँकेकडे हमी म्हणून गहाण ठेवावी लागते. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतले असेल तर तेही वेळेवर फेडावे लागेल. जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नसाल तर बँक तुमच्यावर कारवाई करू शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.
3 / 7
तुम्ही कोणत्याही कारणास्तव कर्जाचे दोन EMI भरले नाहीत. तर बँक तुम्हाला प्रथम याची माहिती देते. तुम्ही तुमच्या गृहकर्जाचे सलग तीन हप्ते चुकवल्यास बँक तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवते. परंतु सूचना दिल्यानंतरही तुम्ही ईएमआय पूर्ण न केल्यास बँकेकडून तुम्हाला डिफॉल्टर घोषीत केले जाईल. यानंतर तुम्हाला कोणत्याही बँकेकडून कर्ज मिळणार नाही.
4 / 7
जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर ते तुमचे रेकॉर्ड खराब करते आणि तुमचा क्रेडिट स्कोअर खराब करते. अशा परिस्थितीत पुढच्या वेळी तुम्हाला बँकेकडून कर्ज सहजासहजी मिळणार नाही. तुम्ही काहीतरी जुगाड करून कर्ज घेतले असले तरीही, तुम्हाला कठोर अटी व शर्तींसह उच्च व्याजदरावर कर्ज उपलब्ध होईल.
5 / 7
तुम्ही ज्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे, जर तुम्ही त्या कर्जाचे सलग तीन हप्ते जमा केले नाहीत आणि बँकेच्या इशाऱ्यानंतरही ईएमआय भरला नाही तर बँक कर्ज खाते एनपीए (बुडीत खाते) मानते. इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही मर्यादा १२० दिवसांची आहे. अशा परिस्थितीत जो कोणी डिफॉल्टर असेल त्याला कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. यामध्ये थकबाकी निर्धारित वेळेत भरण्यास सांगितले जाते. तरीही तुम्ही कर्जाची परतफेड केली नाही, तर या परिस्थितीत तुमच्याकडून गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल.
6 / 7
सुरक्षित कर्जामध्ये मालमत्ता गहाण ठेवली जाते जेणेकरून कर्ज न भरल्यास बँक मालमत्ता विकून कर्जाची परतफेड करू शकते. अशा परिस्थितीत तुमची गहाण ठेवलेली मालमत्ता धोक्यात येते. बँक तुमच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा घेऊ शकते. हा बँकेचा अधिकार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमची गहाण ठेवलेली मालमत्ता वाचवण्यासाठी तुम्हाला बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागेल. यानंतर, तुम्ही तुमची मालमत्ता लिलावासारख्या परिस्थितीपासून वाचवू शकता.
7 / 7
कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेकडून कर्जदाराला बराच वेळ दिला जातो. परंतु कर्जदार अजूनही कर्जाची परतफेड करू शकत नसल्यास बँकेकडून त्याला रिमांडर आणि नोटीस पाठविली जाते. यानंतरही कर्जदाराने कर्ज न भरल्यास बँक त्याच्या मालमत्तेचा ताबा घेते आणि त्याचा लिलाव करते. म्हणजेच, बँक कर्जाची परतफेड करण्यासाठी अनेक संधी देते, तरीही पैसे न भरल्यास, मालमत्तेचा लिलाव करून कर्जाची रक्कम परत केली जाते.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रHomeसुंदर गृहनियोजन