india economy grew 20 percent in first april to june quarter in gdp
India Economy: घे भरारी! देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी कामगिरी; पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के नोंदवला GDP By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 7:43 PM1 / 10नवी दिल्ली: कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला. यानंतर देशाचे अर्थचक्र मोठ्या प्रमाणावर मंदावले. अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद पडले. 2 / 10बेरोजगारी, महागाई यामध्ये वाढ झाली आणि देशाचा GDP एकाएकी उणे झाला. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन बंदी उठवण्यात आली. अर्थचक्र पुन्हा सुरू होते, तोच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा भारतासह अनेक देशांना बसला. 3 / 10कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असला, तरी देश आणि उद्योग, व्यवसाय, व्यापार यातून सावरताना दिसत आहेत. यातच आता देशाच्या अर्थव्यवस्थेने चालु आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के आर्थिक विकास दर (GDP) नोंदवला आहे.4 / 10केंद्र सरकारकडून पहिल्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर करण्यात आली. गेल्या वर्षी कोरोनाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला होता. विकास दराने ऐतिहासिक उणे २४.४ टक्के इतका दर नोंदवला होता. 5 / 10अर्थचक्राच्या ढासळलेल्या स्थितीची जवळपास भरपाई करण्यात सरकारला यश आल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी दर २०.१ टक्के इतका वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीत जीडीपी दर १.६ टक्के नोंदवण्यात आला होता. 6 / 10कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बहुतांश राज्यांनी निर्बंध टप्याटप्यात शिथिल केले होते. बाजारपेठा पूर्वपदावर आल्याने कर संकलनात देखील मोठी वाढ झाली होती.7 / 10पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची कामगिरी अपेक्षेच्या तुलनेत किंचित कमी आहे. आम्ही २१.७ टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, जुलैपासून अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत आहे. 8 / 10लसीकरण ज्या वेगाने वाढेल त्यानुसार अर्थव्यवस्था देखील वेग पकडेल, असे मत कोटक महिंद्रा बँकेच्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ उपासना भारद्वाज यांनी व्यक्त केले. दरम्यान, पहिल्या तिमाहीत बांधकाम क्षेत्राची सर्वाधिक ६८.३ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.9 / 10यानंतर कारखाना उत्पादन क्षेत्राचा ४९.६ टक्के वृद्धी दर नोंदवण्यात आला. पहिल्या तिमाहीत खाणकाम क्षेत्राने देखील दमदार कामगिरी करत १८.६ टक्के वृद्ध दर प्राप्त केला आहे. याशिवाय आठ प्रमुख क्षेत्राच्या कामगिरी देखील प्रचंड सुधारणा झाली आहे.10 / 10गेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या आणि अखेरच्या तिमाहीत जीडीपी दर १.६ टक्के नोंदवण्यात आला होता. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बहुतांश राज्यांनी निर्बंध टप्याटप्यात शिथिल केले होते. बाजारपेठा पूर्वपदावर आल्याने कर संकलनात देखील मोठी वाढ झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications