india post payments bank and lic housing tie up to sell home loans
मस्तच! आता Post Office मध्ये मिळणार होम लोन; LIC सोबत मोठा करार, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 9:42 PM1 / 12नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात ओसरत असून, अनेक क्षेत्रांतील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे. 2 / 12कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार बंद पडले. आता मात्र याची गती वाढून ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. स्वतःचे घर असणे हे मोठे स्वप्न असते. त्यासाठी बहुतांश जण गृहकर्ज घेतात. 3 / 12आता गृहकर्ज म्हणजेच होम लोन घेण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागणार नाहीत, कारण आता जवळच्या Post Office मध्ये होम लोनची सुविधा सुरू होत असून, यासाठी LIC हाऊसिंग फायनान्ससोबत एक मोठा करार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. 4 / 12गृहकर्ज बाजाराच्या विस्तारासाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्सने (LIC Housing Finance) इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसोबत (IPPB) गृहकर्ज बाजार वाढवण्यासाठी करार केला आहे. इंडिया पोस्टचे कर्मचारी त्यांच्यासाठी व्यवसाय आणण्याचे काम करतील.5 / 12या करारानंतर पोस्ट ऑफिस बँकेचे ४.५ कोटी ग्राहक आता LIC हाऊसिंग फायनान्सला उपलब्ध होतील जेथे कंपनीला नवीन बाजारपेठ आणि गृहकर्जांसाठी नवीन ग्राहक मिळतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरात ६५० शाखा आणि १.३६ लाख बँकिंग टच पॉईंट आहेत.6 / 12इंडिया पोस्टच्या नेटवर्क अंतर्गत २ लाखांहून अधिक पोस्टमन आणि ग्राम डाक सेवक आहेत. या लोकांकडे आता मायक्रो एटीएम, बायोमेट्रिक उपकरणांसारख्या सुविधा आहेत. खरं तर, इंडिया पोस्टने बँकिंग सेवेवरही खूप भर दिला आहे. LICHFL साठी इंडिया पोस्टचे कर्मचारी व्यवसाय आणण्याचे काम करतील.7 / 12आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. वेंकटरामू म्हणाले की, LIC हाऊसिंग फायनान्ससोबतचे टाय-अप इंडिया पोस्टसाठी एक मोठे यश आहे. आता आमच्या ग्राहकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर गृहकर्जाची सुविधाही मिळेल. 8 / 12आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय आमचे लक्ष डिजिटल बँकिंगवर आहे. LIC हाऊसिंग फायनान्स सध्या ६.६६ टक्के दराने होम लोन देत आहे. 9 / 12LIC हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, वाय विश्वनाथ गौर म्हणाले की, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेबरोबर धोरणात्मक भागीदारीच्या मदतीने आम्ही स्वतःसाठी नवीन बाजारपेठ शोधू. 10 / 12यामुळे आमची व्याप्ती वाढेल आणि नवीन ग्राहक आमच्यात सामील होतील. इंडिया पोस्ट देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिस नेटवर्कशी करार करणे हे आमच्यासाठी एक मोठे यश आहे.11 / 12LIC हाऊसिंग ६.६६ टक्के दराने होम लोन ऑफर करत असून, हा व्याजदर ५० लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी आहे. CIBIL स्कोअर चांगला असेल तर या व्याजदराने ५० लाखांपर्यंतची गृहकर्जे सहज उपलब्ध होतात.12 / 12यामुळे ग्राहकांना जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन होम लोनच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications