Investment Tips in 2023: Be Rich in the New Year! Debt funds, gold can give good returns
Investment Tips in 2023: नव्या वर्षात असे व्हा श्रीमंत! डेट फंड, सोने देऊ शकते चांगला परतावा By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:46 AM1 / 10२०२१ आणि २०२२ ही वर्षे इक्विटी बाजारासाठी उत्तम राहिली आहेत. यंदाही शेअर बाजारात तेजी असली तरी काही आव्हानेही नव्याने उभी ठाकली आहेत. त्यामुळे येणाऱ्या नव्या वर्षात गुंतवणुकीसाठी नवी रणनीती आखावी लागेल, असे गुंतवणूक क्षेत्रातील जाणकारांना वाटते.2 / 10कोविड-१९ साथीच्या काळात बँकांनी स्वस्त आणि सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता या सवलती संपत आहेत. 3 / 10अनेक देशांत महागाई ४० ते ५० वर्षांच्या उच्चांकावर आहे. रिझर्व्ह बँकेसह जगातील सर्व बँका व्याजदर वाढवीत आहेत. त्यामुळे अमेरिका आणि युरोपातील शेअर बाजारांत घसरण सुरू आहे.4 / 10भारताचे सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी उंचीवर असले तरी यात केवळ ५ टक्के समभागांचे योगदान आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीसाठी नवी रणनीती आवश्यक असल्याचे तज्ज्ञांना वाटते.5 / 10वेगवेगळ्या ॲसेट श्रेणीतील लाभ-हानीत पडायचे नसेल तर मल्टी ॲसेट फंड तुमच्यासाठी उत्तम आहेत. यात फंड व्यवस्थापक डेट फंडासह सोने व इतर श्रेणीतील फंडांत गुंतवणूक करतात.6 / 10२०२३ मध्ये सोने हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. क्रिप्टो करन्सी आपटल्यानंतर सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. सध्या सोने ५४ हजारांच्या पातळीवर आहे. 7 / 10हा भाव सोन्याच्या विक्रमी पातळीपेक्षा २,१०० रुपयांनी कमी आहे. केंद्रीय बँकांचा कलही सोन्याला समर्थन देणारा आहे.8 / 10विद्यमान स्थितीत डेट फंड्स (उदा. रोखे) गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. महागाई व चढ्या व्याजदरामुळे बाँड यिल्ड वाढून ७.२५ टक्के झाले आहे. 9 / 10जानेवारीत ते ६.६ टक्के होते. हाच कल पुढे सुरू राहू शकतो. त्यामुळे छोट्या अवधीच्या फंडांत पैसे गुंतविणे फायदेशीर ठरू शकते.10 / 10१ ते २ वर्षांसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी डायनॅमिक बाँड फंड चांगले आहेत. यातून १० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications