शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Tips: केवळ १० वर्षांत कोट्यधीश व्हाल! कशी करावी गुंतवणूक? ‘हा’ आहे उत्तम पर्याय; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 8:03 PM

1 / 9
पृथ्वीवरील जवळपास प्रत्येक माणसाला आपण एक ना एक दिवस कोट्यधीश व्हावे ज्या वेगात महागाई, खर्च वाढत आहेत, त्यानुसार सेव्हिंग करणे, गुंतवणूक करणे अधिक कठीण होत आहे. अशात गुंतवणुकीचे काही पर्याय फायदेशीर ठरू शकतात. पण अशा गुंतवणुकीत अतिशय काटेकोरपणे, सलग गुंतवणूक करणे गरजेचे आहे. लहान वयातच गुंतवणुकीस सुरुवात केल्यास चांगला फंड तयार करता येतो. (Investment Tips)
2 / 9
जास्तीत जास्त रिटर्न्स हवे असल्यास, तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्यूअल फंडमध्ये (Mutual Fund) एसआयपीच्या (SIP) माध्यमातून अशी गुंतवणूक करणे सोपे तसेच फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने तुम्ही १० वर्षांत एक कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता.
3 / 9
कोरोना कालावधीनंतर गुंतवणुकीबाबत सतर्कता वाढली आहे. सध्या गुंतवणुकीमध्ये म्युच्यूअल फंड, एसआयपीची मोठी चर्चा असून, अनेकजण याकडे वळताना दिसत आहेत. म्युच्यूअल फंडमधील एसआयपी हा गुंतवणुकीचा असा पर्याय आहे, ज्यात महिन्याला अगदी कमी गुंतवणूक करुन काही वर्षांनंतर मोठा फंड तुम्ही तयार करू शकता.
4 / 9
इक्विटी म्युच्यूअल फंड गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये तुम्ही एसआयपीच्याद्वारे लहान बचत करुन मोठी गुंतवणूक करू शकता. ही गुंतवणूक तुम्हाला कोट्यधीश बनवू शकते. ज्यांना मोठी रक्कम जमा करायची आहे, पण एकरकमी रक्कम नाही, ते म्युच्यूअल फंड SIP द्वारे गुंतवणूक करू शकतात.
5 / 9
म्युच्यूअल फंडातील SIP तुम्हाला कमीत-कमी १२ टक्के वार्षिक व्याजदर देऊ शकते. इक्विटी म्युच्यूअल फंडमध्ये तुम्ही १० वर्षांचे टार्गेट ठेवू शकता. या दहा वर्षांच्या गुंतवणुकीतून एक कोटींचा फंड जमा करता येतो. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही महिन्याला एसआयपीमध्ये अॅन्युअल स्टेप-अपचा उपयोग करू शकता.
6 / 9
स्टेप-अप एसआयपीचे एक असे फीचर आहे, जे एका कालावधीनंतर SIP मध्ये तुमचं योगदान वाढवते. तुम्ही दरवर्षी एसआयपीच्या रकमेत काही टक्क्यांची वाढ करू शकता. तुम्ही वार्षिक वाढीद्वारे तुमचं उत्पन्न वाढवू शकता आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार SIP ची रक्कम दरवर्षी वाढवू शकता.
7 / 9
तुम्ही अॅन्युअल स्टेप-अप २० टक्के ठेवू शकता. म्हणजेच दरवर्षी तुम्ही तुमची SIP २० टक्क्यांनी वाढवू शकता. एका कॅलक्युलेटरनुसार, १२ टक्क्यांच्या वार्षिक रिटर्ननुसार, तुम्हाला महिन्याला २१००० रुपयांच्या एसआयपीपासून सुरुवात करावी लागेल.
8 / 9
महिन्याला २१००० रुपयांच्या एसआयपीवर जर अंदाजे वार्षिक रिटर्न्स १२ टक्के आणि वार्षिक स्टेप-अप २० टक्के असेल, तसंच कालावधी १० वर्ष असल्यास तुम्ही १ कोटींचा फंड जमा करू शकता.
9 / 9
कॅलक्युलेटरनुसार, दहा वर्षांनंतर गुंतवणुकीची एकूण रक्कम ६५,४१,५८८ रुपये असेल आणि रिटर्न अमाउंट ३८,३४,५५६ रुपये असेल. अशाप्रकारे तुम्ही १,०३,७६,१४४ रुपयांचा फंड जमा करू शकता.
टॅग्स :Investmentगुंतवणूक