शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Tips: गुंतवणूकदारांची दिवाळी! फक्त २₹चा शेअर गेला ८९६ ₹वर; १ लाखाचे झाले ४ कोटी; छप्परफाड रिटर्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 5:47 PM

1 / 9
गेल्या काही आठवड्यापासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून येत आहेत. जगातील घटनांचा नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मात्र, एकमागून एक अनेकविध कंपन्यांचे आयपीओ शेअर मार्केटमध्ये धडकताना दिसत आहे. यातून चांगला नफा मिळण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना आहे.
2 / 9
यातच काही कंपन्या कमाल कामगिरी करत असून, गुंतवणूकदारांना मोठा परतावा देताना दिसत आहेत. कोरोना संकट कालावधीपासून फार्मा क्षेत्रातील कंपन्यांना सुगीचे दिवस आले असून, अनेक कंपन्यांनी प्रचंड मोठा व्यवसाय केल्याचे पाहायला मिळत आहे. यापैकीच एका कंपनीच्या शेअरनी रॉकेट स्पीड पकडला असून, छप्परफाड रिटर्न दिले आहेत.
3 / 9
भारतीय फार्मास्युटिकल कंपनी सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या २३ वर्षांमध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना ३९ हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. सन फार्मा च्या शेअर्समधील वाढ दर्शवते की, गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी योग्य कंपनीत गुंतवणूक केली आणि त्यांची गुंतवणूक संयमाने ठेवली तर काही हजार किंवा लाखांची गुंतवणूक करून ते कोटींचा नफा कमवू शकतात.
4 / 9
सन फार्माचा शेअर एनएससीवर ८९६.७० रुपये प्रति शेअरवर होता. २३ वर्षांपूर्वी १ जानेवारी १९९९ रोजी जेव्हा सन फार्माच्या शेअर्सने एनएससीवर पहिल्यांदा व्यवहार करण्यास सुरुवात केली तेव्हा त्याची किंमत फक्त २.२७ रुपये होती, जी आता सुमारे ३९,४०२ टक्क्यांनी वाढून ८९६.७० रुपये झाली आहे.
5 / 9
जर एखाद्या गुंतवणूकदाराने २३ वर्षांपूर्वी १ जानेवारी १९९९ रोजी सन फार्माच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आज त्याचे १ लाख रुपयांचे मूल्य सुमारे ३.९५ कोटी झाले असते.
6 / 9
तसेच जर २३ वर्षांपूर्वी सन फार्माच्या शेअर्समध्ये फक्त ३० हजार रुपये गुंतवले असते तर आज त्याचे मूल्य १ कोटी १८ लाख रुपये झाले असते. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे १.९८ टक्के वाढ झाली आहे.
7 / 9
तर गेल्या वर्षभरात त्याची किंमत सुमारे १५.६९ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना ७८.१८ टक्के परतावा दिला आहे. तज्ज्ञांनी सध्याच्या किंमतीवर शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत ९९२ रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.
8 / 9
जूनच्या तिमाहीत सन फार्मास्युटिकलचा एकत्रित नफा ४३ टक्क्यांनी वाढून २,०६१ कोटींवर पोहोचला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत १,४४४ कोटी रुपये होता. कंपनीचे एकत्रित उत्पन्न १०.७ टक्क्यांनी वाढून रु. १०,७६२ कोटी झाले आहे जे मागील वर्षीच्या तिमाहीत रु. ९,७१९ कोटी होते.
9 / 9
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असल्यास योग्य पद्धतीने करावी. तसेच दीर्घकालीन गुंतवणूक अधिक उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक