Investment Tips : गुंतवणूक करताय, पैसे २५ पटीने वाढविण्यासाठी काय कराल ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 11:22 AM2022-09-29T11:22:36+5:302022-09-29T11:30:09+5:30

सध्याच्या काळात गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्या कारणासाठी कधी पैसे लागतील हे सांगणं कठीण आहे.

सध्याच्या काळात गुंतवणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. कोणत्या कारणासाठी कधी पैसे लागतील हे सांगणं कठीण आहे. जर तुम्ही गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त नफा मिळेल. जर तुमचे वय २५ ते ३० वर्षे असेल तर ही गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे.

तुम्ही कमावलेल्या रकमेपैकी किमान २५% बचत करा आणि इक्विटी, बाँड, सोने आणि चांदी यासह विविध मालमत्तांमध्ये गुंतवणूक करा. जर तुम्ही दरमहा ४०,००० रुपये कमावले आणि त्यातील १०,००० रुपये वाचवले, तर येत्या ३६० महिन्यांत तुम्ही त्यातून एकूण ३६ लाख रुपये बचत करू शकता. तुम्ही ही रक्कम एसआयपीद्वारे इक्विटीमध्ये गुंतवल्यास, तुम्हाला १०% वार्षिक परताव्यानुसार सेवानिवृत्तीवर २.२६ कोटी रुपये मिळतील.

किमान परतावा किती? यासाठी १०-५-३ या नियमाचा अवलंब करता येईल. हा नियम विविध प्रकारच्या गुंतवणुकीतून अपेक्षित असलेल्या सरासरी वार्षिक परतावा स्पष्ट करतो. या नियमानुसार, गुंतवणुकीची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली जाते. स्टॉक किंवा शेअर्स, बाँड्स, एफडी आणि बचत खाती किंवा लिक्विड फंड. दीर्घ मुदतीसाठी, स्टॉकमध्ये किमान १०%, डेटमध्ये किमान ५% आणि लिक्विड फंडांमध्ये ३%. रिटर्न मिळतात.

इक्विटीमध्ये किती गुंतवणूक करावी? गुंतवणूकदाराने कोणत्या वयात किती जोखीम घ्यावी हे ठरवण्यासाठी १००-वय सूत्र वापरले जाते. म्हणजेच, गुंतवणूकदाराचे वय १०० वरून वजा केल्यावर जी संख्या येते, तेवढीच टक्केवारी इक्विटीमध्ये गुंतवली पाहिजे. जर गुंतवणूकदाराचे वय ३५ वर्षे असेल तर त्यांनी ६५% रक्कम शेअर्समध्ये गुंतवावी.

नेमके गणित काय? जेव्हा तुम्ही तुमच्या ३० वर्षाच्या आसपास जाता त्यावेळी आपल्या आजूबाजूला तुमच्या बाजूने अनेक घटक असतात. तुमची जोखीम घेण्याची क्षमता जास्त असते आणि तुमच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी ३६० महिने शिल्लक असतात. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याजाचा लाभ घेऊ शकता. वयाच्या २० व्या वर्षी, तुम्ही एसआयपीद्वारे दरमहा १०,००० रुपये गुंतवल्यास, १२% वार्षिक परताव्याच्या दराने पैसे २५ पटीने वाढतील.