शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IRCTC Share Price: प्रत्येक शेअरवर ४ हजारांचा नफा; दोन वर्षांमध्ये बदललं गुंतवणूकदारांचं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 9:49 AM

1 / 9
शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी काही दिवस, महिने किंवा वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचं नशीब अक्षरश: बदलून टाकलं. अशीच एक कंपनी म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC).
2 / 9
v
3 / 9
१४ ऑक्टोबर २०१९ रोजी IRCTC शेअर बाजारात लिस्ट झाली होती. बीएसई इंडेक्सवर याचं लिस्टिंग ६४४ रूपयांवर झालं होतं. याचाच अर्थ ज्यावेळी कंपनी लिस्ट झाली त्यावेळी या कंपनीच्या एका शेअरची किंमत ६४४ रूपये होता. तो कामकाजादरम्यान ७०० रूपयांपर्यंत पोहोचला.
4 / 9
ज्या गुंतवणूकदारांनी ६४४ रूपयांच्या दरावर हा शेअर खरेदी केला असेल, त्यांना आज या कंपनीच्या प्रत्येक शेअरमागे जवळपास ३८०० रूपयांपेक्षा अधिकचा नफा झाला आहे.
5 / 9
दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी IRCTC चा शेअर बीएसई इंडेक्सवर ४४६३.६५ रूपयांवर बंद झाला होता. यानुसार गुंतवणूकदारांना प्रति शेअर ३८२० रूपयांचा नफा झाला आहे. बुधवारी IRCTC चा शेअर ७.१३ टक्क्यांनी वधारून बंद झाला होता.
6 / 9
तर दुसरीकडे IRCTC च्या शेअरनं ५ ऑक्टोबर रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. या दिवशी कंपनीचा शेअर ४५१२ रूपयांवर पोहोचला. ही त्या शेअरची ऑल टाईम हाय पातळी होती.
7 / 9
सध्या कंपनीचं मार्केट कॅप ७१,४१८.४० कोटी रूपये इतकं झालं आहे. लिस्टिंगच्या वेळी कंपनीचं मार्केट कॅप ११ हजार कोटी रूपयांच्या दरम्यान होतं. दोन वर्षांमध्ये कंपनीचं मार्केट कॅप ६० हजार कोटी रूपये वाढलं. यावरून गुंतवणूकदारांच्या नफ्याबाबतही कल्पना येते.
8 / 9
शेअर बाजारात लिस्ट होण्यापूर्वी IRCTC चा IPO आणण्यात आला होता. या आयपीओचं प्राईज बँड ३१५-३२० रूपये इतका निश्चित करण्यात आला. ज्या गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये शेअर अलॉट झाले त्यांच्या प्रति शेअरचे दर ३२० रूपये होते.
9 / 9
या दृष्टीनं पाहायला गेलं तर आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांना ४ हजार रूपयांपेक्षा अधिचा फायदा झाला आहे. IRCTC नं आयपीओच्या एका लॉटमध्ये ४० शेअर्स ठेवले होते.
टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगInvestmentगुंतवणूकMONEYपैसा