शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mukesh Ambani यांच्या Jio-BP नं सुरू केला पहिला पेट्रोल पंप; पाहा कोणत्या मिळणार सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:03 AM

1 / 9
उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिज (Reliance Industries) आणि ऊर्जा क्षेत्रातील (Energy Sector) दिग्गज BP यांनी आपला पहिला पेट्रोल पंप सुरू केला आहे.
2 / 9
रिलायन्स बीपी मोबिलिटी (RBML) चा पेट्रोल पंप नवी मुंबईच्या नावडे येथे सुरू करण्यात आला. या पेट्रोल पंपावर ग्राहकांना इलेक्ट्रीक वाहन (Electric Vehicles) चार्जिंग स्टेशनसह अन्य इंधन पर्यायही उपलब्ध असतील.
3 / 9
२०१९ मध्ये BP ने रिलायन्सच्या मालकीच्या १,४०० पेट्रोल पंप आणि ३१ विमान इंधन (ATF) स्टेशन्समध्ये ४९ टक्के हिस्सा विकत घेतला होता. रिलायन्सचे सध्याचे पेट्रोल पंप या जॉईंट व्हेन्चर्सकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत.
4 / 9
२०२५ पर्यंत पेट्रोल पंपांची संख्या ५,५०० पर्यंत नेण्याची या जॉईंट व्हेन्चरची योजना आहे. RBML मधील उर्वरित ५१ टक्के हिस्सा रिलायन्सकडेच आहे.
5 / 9
देशातील वाहन इंधन रिटेल क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांचे वर्चस्व आहे. देशातील एकूण ७८,७५१ पेट्रोल पंपांपैकी बहुतेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकीचे आहेत.
6 / 9
RBML कडे १,४२७ आउटलेट्स आहेत, तर रोसनेफ्ट समर्थित Naira Energy चे ६,२५० पेट्रोल पंप आहेत. शेलचे २८५ पेट्रोल पंप आहेत. सध्याच्या १,४०० पेट्रोल पंपांच्या नेटवर्कला जिओ-बीपीच्या रूपात रिब्रँड केलं जाणार आहे.
7 / 9
इंधन भरण्याशिवाय आणि इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगशिवायही या ठिकाणी अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. कंपनी कॅस्ट्रॉलसोबत मिळून या ठिकाणी ऑईल बदलण्याची सुविधाही देणार आहे.
8 / 9
याव्यतिरिक्त कंपनी ग्राहकांना वाईल्ड बीन कॅफेद्वारे २४ तास खाद्यपदार्थांची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. या ठिकाणी ग्राहकांना चहा, कॉफी आणि अन्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
9 / 9
जिओ बीपी आपल्या ग्राहकांना इन्स्टन्ट डिस्काऊंट, हॅपी अवर स्कीम, फ्लेक्सिबल आणि युनिफॉर्म डिजिटल पेमेंटसारख्या सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. इंधन आणि मोबिलिटीची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी जिओ बीपी मोबिलिट स्टेशन्स डिझाईन करण्यात आले आहेत.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीRelianceरिलायन्सPetrol Pumpपेट्रोल पंप