शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata च्या 'या' ब्रॉडबँड प्लॅनची Jio ला टक्कर! स्पीड Same, पण पैशांत मोठा फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 6:05 PM

1 / 8
हाय-स्पीड ब्रॉडबँड कनेक्शनचा विचार केल्यास, अनेक इंटरनेट सेवा पुरवणारे 1 Gbps इंटरनेट स्पीड (1 Gbps ब्रॉडबँड योजना) ऑफर करतात. टाटा प्ले ब्रॉडबँड आणि रिलायन्स जिओ, या अशा दोन कंपन्या आहेत, ज्या त्यांच्या युजर्ससाठी अत्यंत आकर्षक 1Gbps प्लॅन देतात.
2 / 8
एकीकडे टाटा प्ले परवडणारे प्लॅन्स ऑफर करते. तर दुसरीकडे जिओ अनेक बेनिफिट्ससह आपले प्लॅन्स ऑफर करते. असे असताना जाणून घेऊया कुणाचा प्लॅन चांगला आणि किफायतशीर आहे, Tata Play की Jio?
3 / 8
Tata Play Fiber 1 Gbps Plan टाटा स्कायने नुकतेच आपले नाव बदलून टाटा प्ले फायबर केले आहे. मात्र, याचे प्लॅन्स तेच आहेत. Tata Play Fiber चा हाय-एंड अनलिमिटेड 1 Gbps मासिक प्लॅन 3,600 रुपयांनाच आहे. हा प्लॅन युजर्स लॉन्ग टर्मसाठीही मिलवू शकता. कारण कंपनी वेगवेगळ्या व्हॅलिडिटीसाठी 1 Gbps प्लॅन ऑफर करते.
4 / 8
युजर्स तीन महिन्यांच्या वैधतेसाठी हा प्लॅन 10,800 रुपयांत खरेदी करू शकतात, सहा महिन्यांच्या वैधतेच्या कालावधीसाठी प्लॅनची ​​किंमत रु. 19,800 आहे. यावर युजर्सना थेट 1,800 रुपयांचा फायदा होतो.
5 / 8
तर एका वर्षाच्या कालावधीसाठी प्लॅनची किंमत 36,000 रुपये एवढी आहे. या प्लॅनमध्ये युजर्स 7,200 रुपयांची बचत करू शकतात. या ब्रॉडबँड प्लॅनसह युजर्सना 3300GB किंवा 3.3TB फेअर युसेज पॉलिसी (FUP) डेटा मिळतो यानंतर वेग 3 Mbps पर्यंत कमी होतो.
6 / 8
JioFiber 1 Gbps Plan - हाय-एंड प्लॅन्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, Jio वेगवेगळ्या डेटा मर्यादांसह दोन 1 Gbps प्लॅन ऑफर करते. JioFiber ने ऑफर केलेला पहिला प्लॅन 3,999 रुपये प्रति महिना असा आहे आणि 3.3TB किंवा 3300GB च्या FUP डेटा मर्यादेसह 1 Gbps इंटरनेट स्पीड ऑफर करतो.
7 / 8
याशिवाय Jio च्या या प्लॅनसह OTT सब्सक्रिप्शन मिळते. यात Netflix, Amazon Prime Video, Disney+ Hotstar आणि इतरही काही प्लॅटफार्मचा समावेश होतो. या प्लॅनसोबत येणाऱ्या Amazon Prime Video ची व्हॅलिडिटी एक वर्षांची आहे.
8 / 8
दोन्ही प्लॅनमध्ये फरक - अशा स्थितीत, तुमच्यासाठी कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला स्वस्त प्लॅन हवा आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन हवे आहे, यावर अवलंबून आहे. किंतीचा विचार केल्यास टाटा प्लेचा प्लॅन जिओच्या तुलनेत 399 रुपयांनी स्वस्त आहे.
टॅग्स :TataटाटाJioजिओInternetइंटरनेट