SIP Calculator: आपली SIP सुरू करण्याची इच्छा आहे? बम्पर नफा मिळविण्यासाठी जाणून घ्या, हे 5 खास 'गुरु मंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 01:48 PM2022-10-03T13:48:53+5:302022-10-03T13:57:24+5:30

जाणून घेऊयात SIP च्या माध्यमाने म्‍यूच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे 5 सर्वात मोठे फायदे...

शेअर बाजारात सातत्याने होत असलेल्या चढ उतारामुळे, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचा SIP वर अधिक विश्वास आहे. असोसिएशन ऑफ म्‍यूच्युअल फंड्स इन इंडिया (Amfi)च्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात SIP अकाउंट्सची संख्या वाढून 5.71 कोटींवर पोहोचली आहे.

म्‍यूच्युअल फंडात गुंतवणूक करताना जोखीमही असते. पण, थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्‍यूच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम कमी असते. अशात आपण SIP च्या माध्यमाने गुंतवणूक करू शकता. तर जाणून घेऊयात SIP च्या माध्यमाने म्‍यूच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचे 5 सर्वात मोठे फायदे.

म्‍यूच्युअल फंडात SIP च्या माध्यमाने गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेची आवश्यकता नसते. SIP च्या अशाही काही स्कीम्स आहेत, ज्यांत आपण 100 रुपयांपासूनही गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतो. यामुळे आपल्याला गुंतवणुकीवरील रिस्‍क आणि त्यावर मिळणाऱ्या परताव्याचे आकलनही सहजपणे करता येईल.

SIP च्या माध्यमाने गुंतवणूक केल्यास, रेग्‍युलर सेविंग आणि इन्‍वेस्‍टमेंटची सवयही लागते. यात आपल्याला एका निश्चित तारखेला ठराविक रक्कम जमा करावी लागते. याची आपण पहिल्यापासूनच तयारी करून ठेवता आणि आपल्यला सवयही लागते.

SIP मध्ये आपले इंव्हेस्‍टमेंट अकाउंट आपल्या बँक अकाउंटला लिंक केले जाते. येथून एक प्री-डिसायडेड अमाउंट आपल्या अकाउंटवरून एका न‍िश्‍च‍ित तारखेला कट होते. यामुळे एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत सोपे आहे.

म्‍यूच्युअल फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्याला KYC प्रॉसेस पूर्ण करणे आवश्यक आहे. यात आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ असणे आवश्यक आहे. यासाठी पॅन आणि आधार कार्डचीही आवश्यकता असते.

SIP Calculator च्या मदतीने आपण एखाद्या फंडाचा अंदाजही लाऊ शकता. कुठल्याही फंडाच्या मागील परफॉर्मन्सच्या आधारे आगामी वर्षांसाठीच्या वार्षीक ग्रोथचा अंदाज लावणे सोपे आहे.