शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हे आहेत, भारतातील टॉप 5 दानशूर उद्योगपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 1:41 PM

1 / 5
हुरुन इंडियाने देशातील सर्वाधिक दानशूरांची यादी तयार केली आहे. त्यानुसार, सर्वाधिक जास्त दान करणारे श्रीमंत व्यक्ती म्हणून पहिल्या स्थानावर शिव नादर यांचा समावेश आहे. शिव नादर HCLचे संस्थापक आहे. त्यांनी 2019 च्या रिपोर्टनुसार, 826 कोटी रुपये दान केले आहेत.
2 / 5
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर विप्रोचे संस्थापक अजीम प्रेमजी आहेत. त्यांनी एकूण 453 कोटी रुपये दान केले आहे.
3 / 5
धार्मिक कार्यासाठी सर्वात जास्त दान करणारे रिलायन्सचे मुकेश अंबानी तिसऱ्या क्रमाकांवर आहेत. त्यांनी एकूण 402 कोटी रुपये दान केले आहेत.
4 / 5
इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यादीत चौथ्या स्थानवर आहेत. त्यांनी एकूण 204 कोटी रुपयांचे दान केले होते.
5 / 5
पाचव्या स्थानवर पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचे नाव आहे. त्यांनी 200 कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत.
टॅग्स :businessव्यवसाय