lic sends sms to policyholders for linking pan card with your policy know about full procedure
तुम्हालाही आलाय LIC ने पाठवलेला SMS; अजिबात दुर्लक्ष करू नका, नाहीतर पस्तावाल! By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 2:17 PM1 / 10आताच्या घडीला अनेकविध कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये सादर केले जाणार आहेत. यामध्ये देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा महामंडळाचे (Life Inurance Corporation of India) नावही आघाडीवर आहे. 2 / 10केंद्रातील मोदी सरकारकडून चालु आर्थिक वर्षात LIC चा IPO सादर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. LIC च्या अनेक दमदार योजनांमुळे ग्राहकांचा या कंपनीवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. गुंतवणूकदारही एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत असल्याचे बोलले जात आहे. 3 / 10यातच आता LIC ने आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना देणारा SMS पाठवल्याची माहिती मिळाली आहे. पॉलिसीधारकांसाठी हा संदेश अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे. (pan card link to lic policy)4 / 10LIC ने पॉलिसीधारकांना पाठवलेल्या SMS मध्ये म्हटले आहे की, पीएमएलएनुसार ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख पेमेंटसाठी पॅन (PAN) आवश्यक आहे. म्हणून, पॉलिसीधारकांनी ताबडतोब त्यांच्या एलआयसी पॉलिसीला (LIC Policy) पॅन जोडावे.5 / 10अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांना पॅनकार्ड जोडले जात आहे. यानंतर आता LIC नेही पॅन लिंक करण्यास सांगितले आहे. पॅन पॉलिसीशी जोडण्याचे अनेक फायदे आहेत. पॅन कार्डला एलआयसी पॉलिसीशी जोडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, असे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे. 6 / 10LIC च्या पॉलिसीला पॅन कार्ड जोडणे सोपे आहे. आपल्याला यात जास्त काही करण्याची गरज नाही. तुमच्या पॉलिसीशी पॅन लिंक करण्यासाठी www.licindia.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.7 / 10तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि त्याच नंबरवर OTP येईल. त्या OTP सह लिंकिंग पूर्ण होईल. फॉर्म सबमिट केल्यानंतर, एक मेसेज येईल. ज्यामध्ये नोंदणी पूर्ण झाल्याबद्दल माहिती दिली जाईल. 8 / 10LIC ने यासाठी ३ टप्पे दिले आहेत, ज्याच्या मदतीने एलआयसी पॉलिसी पॅनशी जोडणे सोपे होईल, असे सांगितले जात आहे. याशिवाय एलआयसीच्या साइटवर पॉलिसींच्या सूचीसह पॅन तपशील देण्यात आला आहे.9 / 10तुमचा फोन नंबर तेथे प्रवीष्ट करा. त्यानंतर LIC कडून एक OTP येईल, तो सादर करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी नोंदणीचा संदेश मिळेल. तुमचे पॅन LIC पॉलिसीसोबत जोडलेले आहे, याची ती पोच असेल.10 / 10LIC आता थेट ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा करते. जर तुमची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल आणि पॉलिसी पॅन कार्डशी जोडलेली नसेल तर पैसे ट्रान्सफर करण्यात अडचण येईल. म्हणून, पुढील अडचणी टाळण्यासाठी तुमची पॉलिसी पॅनशी लवकरात लवकर जोडावी, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications