शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 07:53 PM2024-11-29T19:53:20+5:302024-11-29T20:03:33+5:30

गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 12436% वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 8.30 रुपयांवरून वाढून 1000 रुपयांच्या वर बंद झाला आहे...

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचा शेअर शुक्रवारी विक्रमी उच्चांकावर पोहोचला. हा शेअर्स शुक्रवारी बीएसईवर 9 टक्क्यांहून अधिकने वाधारून 1061.25 रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, व्यवहाराअंती कंपनीचा शेअर 1040.50 रुपयांवर बंद झाला.

गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. या कालावधीत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचा शेअर 9 रुपयांवरून 1000 रुपयांपर्यंत वधारला. या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 516.20 रुपये एवढा आहे.

4 वरषांत दिला 10827% परतावा - लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचा (Lloyds Metals and Energy) शेअर गेल्या 4 वर्षांत 10827% ने वधारला आहे. हा शेअर 27 नोव्हेंबर 2020 रोजी 9.60 रुपयांवर होते. 29 नोव्हेंबर 2024 रोजी कंपनीचा शेअर 1040.50 रुपयांवर बंद झाला.

गेल्या 5 वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 12436% वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 8.30 रुपयांवरून वाढून 1000 रुपयांच्या वर बंद झाला आहे.

गेल्या 3 वर्षांचा विचार करता, लॉयड्स मेटल्स आणि एनर्जीच्या शेअर्समध्ये 1180% ची वाढ झाली आहे. आता लॉयड्स मेटल्सचे मार्केट कॅप 54,398.55 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

वर्षभरात 97% ने वाढला लॉयड्स मेटल्सचा शेअर - गेल्या एका वर्षाचा विचार करता, हा शेअर गेल्या एका वर्षा 97 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी कंपनीचा शेअर 525.90 रुपयांवर होता. 29 नोव्हेंबर 2024 रोजी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचा शेअर 1040.50 रुपयांवर बंद झाला.

या वर्षी आतापर्यंत मल्टीबॅगर कंपनीचा शेअर 72% ने वधारला आहे. याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, लॉयड्स मेटल्स आणि एनर्जीचा शेअर 50 टक्क्यांहून अधिकने वाधारला आहे. गेल्या 2 वर्षांत, लॉयड्स मेटल्स आणि एनर्जीच्या शेअर्समध्ये 496% ने वधारला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)