शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करा संकल्प, नव्या वर्षात पैसा राखण्याच्या ९ युक्त्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 10:33 AM

1 / 10
वर्षअखेर जवळ आली की मनात नवनवीन संकल्प डोकावू लागतात. आहारविहाराच्या बाबतीत दरवर्षी नवीन संकल्प केले जातात. हे संकल्प आणि त्यांची अंमलबजावणी आपल्या प्रकृतीसाठी महत्त्वाचीच. पण आपली आर्थिक प्रकृती सुधारण्यासाठी आपण काय संकल्प करू शकतो?
2 / 10
सर्वप्रथम आपल्या आर्थिक स्थितीची पडताळणी करा. आपले उत्पन्न, मालमत्तेवर असलेले कर्ज, बचतीचे गुणोत्तर, वार्षिक उत्पन्न आणि बचतीचे प्रमाण आणि दर महिन्याला भरावे लागणारे हप्ते याची एकदा पडताळणी करा.. त्यामुळे आपल्याला आपल्या आर्थिक परिस्थितीचा नेमका अंदाज येतो. भविष्यातील महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेताना, नवीन नियोजन करताना याचा फायदा होतो.
3 / 10
नेहेमीचे खर्च वजा जाता आपल्याकडे अचानक उदभवणाऱ्या, तातडीच्या खर्चासाठीची आर्थिक तरतूद असायला हवी. ही तरतूद आपल्या सहा महिन्यांच्या खर्चाएवढी असली पाहिजे.
4 / 10
पुरेसे विमा संरक्षण महत्त्वाचे! पुरेसे म्हणजे किती? आपला वार्षिक खर्च (अत्यावश्यक खर्च (अ)विवेकी खर्च), हफ्ते, करवजा जाता, आपल्या जीवनशैलीशी तडजोड न करावी लागता, एकूण महागाईचा विचार करता जे खर्चाचे मूल्य असते, तेवढ्या रकमेचे जीवन विमा संरक्षण हवे.
5 / 10
जीवन विमा संरक्षणासोबतच वैद्यकीय खर्चाची तरतूद म्हणून आरोग्य विमा गरजेचा. यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या समस्या, त्यातून कोणत्या वैद्यकीय अडचणी उभ्या राहू शकतात, त्यासाठी किती खर्च येऊ शकतो, याचा विचार करून हा विमा घ्यावा.
6 / 10
आपल्या कमाईच्या किमान ३० टक्के रक्कम बचतीसाठी बाजूला काढली पाहिजे.
7 / 10
कर वाचवण्यासाठीची गुंतवणूक - पीपीएफ, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स यात दर महिन्याला गुंतवणूक केल्यास कर सवलतीत चांगला फायदा मिळतो.
8 / 10
कर्ज घेताना परतफेडीसाठी आपल्याकडे त्या मूल्याची स्थावर मालमत्ता असेल, असे पाहावे. शैक्षणिक कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे, त्यात कर सवलत मिळते.
9 / 10
आपल्यावरील कर्ज लवकरात लवकर फेडण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: वैयक्तिक कर्जाचा हप्ता जास्त असतो. असे कर्ज लवकरात लवकर फेडावे.
10 / 10
आपले कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्ड बिल वेळच्या वेळी भरून चांगला क्रेडिट स्कोर राहील, याची काळजी घ्यावी.
टॅग्स :Investmentगुंतवणूक