शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Oxygen Shortage: मारुतीचे अनेक प्रकल्प तात्पुरते बंद; आता कंपनी ऑक्सिजनची निर्मिती करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 8:26 PM

1 / 10
नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका देशाला बसताना दिसत आहे. कोरोबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, कोरोना मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.
2 / 10
ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहेत. टाटा, रिलायन्स या कंपन्यांनी ऑक्सिजन पुरवठा, निर्मिती यांसाठी पुढाकार घेत आहेत. (oxygen shortage)
3 / 10
टाटा, रिलायन्सनंतर आता मारुती सुझुकी कंपनीने ऑक्सिजन निर्मितीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून, यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
4 / 10
देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी असलेल्या मारुतीने आपले अनेक प्रकल्प तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मारुती सुझुकी कंपनी वैद्यकीय गरजा लक्षात घेता ऑक्सिजन देण्यासाठी हरियाणामधील प्रकल्प बंद करणार आहे. (maruti suzuki will shut down factories in haryana)
5 / 10
देखभाल दुरुस्तीसाठी ऑटो क्षेत्रातील कंपन्या अनेकदा जूनमध्ये प्लांट बंद करतात. त्याचवेळी आता मारुती १ ते ९ मेपर्यंत सर्व प्लांट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, यावेळी कंपनी ऑक्सिजनही तयार करणार आहे.
6 / 10
वाहन उत्पादनाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून मारुती सुझुकी त्याच्या प्लांटवर ऑक्सिजनचे एक छोटेसे युनिट चालवते. सद्यस्थिती लक्षात घेता आमचा विश्वास आहे की, सर्व उपलब्ध ऑक्सिजन जीव वाचवण्यासाठी वापरला जावा, असे मारुतीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
7 / 10
देशात अनेक कंपन्या ऑक्सिजन बनवतात. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स लिमिटेड, रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, एलेनबेरी इंडस्ट्रियल गॅस लिमिटेड, नॅशनल ऑक्सिजन लिमिटेड, भगवती ऑक्सिजन लिमिडेट., गगन गॅसेस लिमिडेट, लिंडे इंडिया लि. या कंपन्या ऑक्सिजन निर्मित करतात.
8 / 10
ऑक्सिजनचा वापर फक्त रुग्णालयातील रुग्णांसाठीच होत नाही तर स्टील, पेट्रोलियम इत्यादी बर्‍याच उद्योगांमध्येही होतो. टाटा स्टील दररोज २०० ते ३०० टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन सर्व रुग्णालये आणि राज्य सरकारकडे पाठवित आहे.
9 / 10
महाराष्ट्रात कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता जिंदाल स्टीलमार्फत दररोज सुमारे १८५ टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्य सरकारला केला जात आहे.
10 / 10
आर्सेलर मित्तल निप्पो स्टील रुग्णालय आणि राज्य सरकारांना दररोज २०० मेट्रिक टन द्रव ऑक्सिजन पुरवतो. बोकारो, भिलाई, राउरकेला, दुर्गापूर, बरनापूर या स्टील प्लांटमधून सुमारे ३३ हजार ३०० टन द्रव ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOxygen Cylinderऑक्सिजनMaruti Suzukiमारुती सुझुकीAutomobile Industryवाहन उद्योग