ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 14 - रिलायन्स जिओ आपल्या प्रतिस्पर्धींना टक्कर देण्यासाठी अवघ्या 500 रुपयांमध्ये 4जी सेवा देणारा फोन बाजारात आणणार आहे. यातच, सध्या Lyf ब्रॉन्डच्या जिओ VoLTE फोनची छायात्रिचे सध्या व्हायरल झाली आहेत. त्यामुळे जिओच्या या फोनची सर्वत्र खळबळ सुरु आहे. TechPP द्वारा शेअर करण्यात आलेल्या या छायाचित्रानुसार, हा फोन Kai ऑपरेटिंग सिस्टिवर काम करेल, जो HTML5 च्या आधारित फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमचा स्प्लिट व्हर्जन आहे. तसेच, या फोनमध्ये KaiOS प्लस नावाने एक अॅप स्टोर सुद्धा असणार आहे. त्यामध्ये फेसबुक आ जिओचे अॅप्स असणार आहेत. याचबरोबर या फोनमध्ये वायफाय, ब्लूट्यूथ, जीपीएस आणि युएसबीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. भारतातील भाषांसाठी या फोनमध्ये एक इन-बिल्ट व्हॉईस असिस्टेंट असणार आहे. (रिलायन्स जिओ नेटवर्कमध्येही नंबर 1)(रिलायन्स जिओचा 1500 रुपयांचा जबरदस्त फोन लवकरच होणार लाँच)(रिलायन्स जिओ आणि गुगल आले एकत्र, बनवणार स्वस्त 4जी फोन)मीडियातील काही वृत्तांनुसार, रिलायन्स जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच कलक डिस्प्ले आणि 512 एमबी रॅम असणार आहे. तसेच, 4 जीबी इंटर्नल स्टोरेज सुविधा असेल. तर, 128 जीबी मेमरी कार्ड पण देण्यात येणार आहे. 2 मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि VGA फ्रन्ट कॅमेरा असणार आहे. याचबरोबर, या फोनमध्ये डेडिकेटेड की असणारी टॉर्च लाइट देण्यात येणार आहे. तर, 2000mAh इतकी बॅटरी सुद्धा असेल. दरम्यान, रिलायन्स जिओ चालू महिन्यात 4 जी फोन सादर करण्याची शक्यता आहे. येत्या 21 जुलै रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या होणार्या वार्षिक बैठकीदरम्यान हा 4 जी फोन सादर करेल असे वर्तविण्यात येत आहे.