अरे व्वा! पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये फक्त 95 रुपये गुंतवा आणि तब्बल 14 लाख रिटर्न मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 03:05 PM2022-10-03T15:05:51+5:302022-10-03T15:18:26+5:30

Post Office Scheme : आज आम्ही तुम्हाला अशीच एक बेस्ट योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणूक करुन जास्त रिटर्न मिळू शकता.

भारतात आजही अनेक जण रिस्क नसलेल्या ठिकाणी पैसे गुंतवण्यावर विश्वास ठेवतात. अशातच पोस्ट ऑफिसच्या विविध योजना या गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहेत. आज आम्ही तुम्हाला अशीच एक बेस्ट योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणूक करुन जास्त रिटर्न मिळू शकता.

पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये तुम्हाला फक्त दिवसाला 95 रुपये गुंतवायचे आहेत. ही सुमंगल ग्रामीण पोस्ट जीवन विमा योजना (Gram Sumangal Rural Postal Life Insurance Scheme) आहे. ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही मोठी कमाई करू शकता. या योजनेचा ग्रामीण भागातील लोकांना जास्त फायदा होणार आहे.

या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही योजना भारतातील ग्रामीण लोकांसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेत दररोज 95 रुपयांची छोटी गुंतवणूक करून, गुंतवणूकदार 14 लाख रुपये कमवू शकतात. सुमंगल ग्रामीण डाक जीवन विमा योजना ही पोस्ट ऑफिसची मनी बॅक योजना आहे. या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊया...

दुर्बल घटकांसाठी किंवा ज्यांना जेमतेम पैसे मिळतात अशा महिला किंवा पुरुष यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सरकारने या योजनेची हमी दिली आहे. सुमंगल योजना ही एक मनी बॅक स्कीम आहे. यामध्ये ठरावीक कालावधीनंतर तुम्हाला पैसे रिटर्न मिळतात. गुंतवणूकदारांच्या मृत्यूनंतरही याचा लाभ नॉमिनलला घेता येतो.

जर मॅच्युरिटीआधी गुंतवणूकदारांचा मृत्यू झाला तर नॉमिनीला काही ठरावीक रक्कम मिळू शकते. या योजनेमध्ये 19 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत महिला किंवा पुरुष गुंतवणूक करू शकतात. कमीत कमी 15 ते 20 वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करता येते.

गुंतवणूकदाराला 10 वर्षांपर्यंत सम एश्योर्ड रक्कम मिळते. तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 20 टक्के मनी बॅक पॉलिसी 6, 9 आणि 12 वर्षांनी मिळणार आहे. बाकी 40 टक्के रक्कम मॅच्युरिटीवर मिळणार आहे. जर तुम्ही 20 वर्षांसाठी ही पॉलिसी काढली असेल तर तुम्हाला 8, 12 आणि 16 वर्षांनी मनी बॅक पैसे मिळणार आहेत. उर्वरित 40 टक्के रक्कम ही मॅच्युरिटीनंतर मिळणार आहे.

तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी ही योजना खरेदी करता. तुम्ही 1 लाख रुपये 20 वर्षांसाठी गुंतवले. तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 2853 रुपये पैसे भरावे लागतील. दिवसाला तुम्हाला 95 रुपये भरायचे आहेत. मॅच्युअरिटीपर्यंत व्याजासकट ही रक्कम 14 लाख रुपये होते. त्यापैकी तीन टप्प्यात तुम्हाला 20 टक्के रक्कम मनी बॅक मिळणार आहे. उर्वरित रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीवर मिळणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.