Post Office चा भन्नाट प्लान! मिळतायत उत्तम रिटर्न्स; PM मोदींनीही केलीय गुंतवणूक, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 12:22 AM2021-11-17T00:22:20+5:302021-11-17T00:27:13+5:30

Post Office च्या एका प्लानमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते आहे.

आताच्या घडीला अनेकविध कंपन्यांचे विविध प्लान उत्तम रिटर्न्स देत आहे. मात्र, गुंतवणूक करताना योग्य विचार आणि निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. देशातील विश्वासार्ह गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी एक म्हणजे Post Office मधील गुंतवणूक.

Post Office मधील गुंतवणुकीतून निश्चित परतावा मिळतो. सरकारच्या अखत्यारित येत असल्याने यातील पैसे शक्यतो बुडत नाही, असे सांगितले जाते. तुम्हाला छोटी गुंतवणूक करून नफा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे.

Post Office च्या एका प्लानमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवन विमा (Life Insuarance) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात (National Saving Certificate) गुंतवणूक केली आहे.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, जून २०२० मध्ये त्यांनी एनएससी (NSC) मध्ये ८ लाख ४३ हजार १२४ रुपये गुंतवले आहेत. जीवन विम्यासाठी त्यांनी १ लाख ५० हजार ९५७ रुपये प्रिमीयम जमा केला होता.

जर तुम्हाला शून्य जोखमीवर गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करावी. आणि जर तुम्हाला सुरक्षित आणि सरकारी योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणूक करू शकता. ही सुरक्षित गुंतवणूक आहे.

ही योजना पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनेचा भाग आहे आणि देशाचे पंतप्रधान स्वतः त्यात गुंतवणूक करत आहेत. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा किमान लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असतो. म्हणजे पाच वर्षांच्या गुंतवणुकीनंतरच तुम्ही ते काढू शकाल. NSC मध्ये तीन प्रकारे गुंतवणूक करता येते.

सिंगल प्रकारात तुम्ही स्वतःसाठी किंवा अल्पवयीन व्यक्तीसाठी गुंतवणूक करू शकता. तर, जॉइंट ए प्रकारचे प्रमाणपत्र कोणतेही दोन लोक एकत्र घेऊ शकतात, म्हणजेच दोन लोक एकत्र गुंतवणूक करू शकतात. याशिवाय, जॉइंट बी यामध्ये दोन लोक गुंतवणूक करतात, पण मॅच्युरिटीवर पैसे फक्त एकाच गुंतवणूकदाराला दिले जातात.

या पोस्ट ऑफिस योजनेवर सध्या ६.८ टक्के व्याजदर आहे. तुम्ही या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवू शकता आणि १०० च्या पटीत पैसे गुंतवू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही.

जर तुम्ही एनएससी (NSC) मध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला आयकर कलम ८० सी अंतर्गत दरवर्षी १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करून देखील कर सूट मिळेल. करपात्र उत्पन्नाच्या बाबतीत एकूण उत्पन्नातून रक्कम वजा केली जाते.