शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' फंडानं केली कमाल, ₹10 हजारांच्या गुतवणूकीतून बनला ₹2.6 कोटींचा फंड; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:30 PM

1 / 6
Power of SIP: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP), हा एक साधा आणि सोपा मार्ग आहे. यामध्ये, गुंतवणूकदार दरमहा ठराविक रक्कम गुंतवून दीर्घ मुदतीत मोठा निधी मिळवू शकतो. यामध्ये एक फायदा असा आहे की, गुंतवणूकदार एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीने परताव्याचा अंदाज लावू शकतो.
2 / 6
असे अनेक फंड्स आहेत, ज्यांनी दीर्घकाळात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. SIP च्या वाढत्या पॉवरचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, SIP गुंतवणूक सप्टेंबरमध्ये विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांनी एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये 16 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली. एसआयपी गुंतवणुकीने 16 हजार कोटी रुपयांची पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
3 / 6
SIP द्वारे तुम्हाला करोडपती बनवणारा एक फंड म्हणजे ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट फंड आहे. या फंडाच्या SIP कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, जर एखाद्याने योजना सुरू झाल्यापासून 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत मासिक 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्याची 21 वर्षांत एकूण गुंतवणूक 25.2 लाख रुपये झाली असती आणि 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 2.1 कोटी रुपयांपर्यंत वाढले असते. या योजनेत किमान एकरकमी 5000 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते, तर SIP 100 रुपयांपासून सुरू करून करता येतो. ही योजना 31 ऑक्टोबर 2002 रोजी सुरू करण्यात आली आहे.
4 / 6
ICICI प्रुडेन्शियल मल्टी-अॅसेट फंड ही इक्विटी, डेट आणि एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटी डेरिव्हेटिव्ह/गोल्ड ETFs/REITs आणि InvITs/प्रेफरन्स शेअर्सच्या युनिट्समध्ये गुंतवणूक करणारी एक मुक्त योजना आहे. दीर्घकाळात हाय रिटर्न्स देण्याच्या प्रयत्नात अनेक अॅसेट क्लास आणि मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये निधीची गुंतवणूक करणे, हे त्यांचे गुंतवणूक धोरण आहे. हे तीन किंवा अधिक मालमत्ता वर्गांमध्ये त्यांच्या मालमत्तेपैकी किमान 10% वाटप करते.
5 / 6
म्युच्युअल फंडातील एसआयपी गुंतवणूकदारांना हे माहित असले पाहिजे की, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम देखील आहेत. त्यामुळे त्यांचा परतावा दरही बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असतो. तो वाढू किंवा कमी होऊ शकतो. यामुळे तुमचा अंदाजे परतावा आकडा देखील बदलू शकतो.
6 / 6
गुंतवणूकदाराने त्यांचे उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा. SIP ची खासियत अशी आहे की तुम्ही फक्त 100 रुपयांपासून मासिक गुंतवणूक सुरू करता येते. याद्वारे, तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या सवयी, जोखीम आणि परताव्याचे मूल्यांकन सहजपणे जाणून आणि समजून घेऊ शकता. (टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसायshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारMONEYपैसा