शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी आता या दोन स्टॉक्समध्ये लावला पैसा! जाणून घ्या, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 5:57 PM

1 / 8
दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्याकडे स्टॉक मार्केटचा प्रचंड अनुभव आहे. राकेश झुनझुनवाला यांनी स्वत:च अनेक वेळा सांगितले आहे की, त्यांनी केवळ 5000 रुपयांपासूनच गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. पण आज त एक अब्जाधीश गुंतवणूकदार आहेत. (Rakesh Jhunjhunwala portfolio stocks)
2 / 8
राकेश झुनझुनवाला कोणताही स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्याचा संपूर्ण अभ्यास करतात. यामुळेच त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या अनेक स्टॉक्सनी सातत्याने चांगला परतावा दिला आहे.
3 / 8
राकेश झुनझुनवाला नेहमीच आपल्या पोर्टफोलिओचा आढावा घेत असतात. एवढेच नाही, तर ते त्यांना आवडणाऱ्या शेअर्समध्येही गुंतवणूक वाढवायला कधी मागेपुढे बघत नाहीत.
4 / 8
राकेश झुनझुनवाला हे केवळ अशाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, ज्या मुळात चांगल्या आहेत. झुनझुनवाला यांनी नुकतीच मेटल शेअर्समध्येही भागीदारी वाढवली आहे.
5 / 8
झुनझुनवाला यांनी नुकतीच नाल्को (NALCO) आणि स्टील निर्माता कंपनी सेलमध्ये (SAIL) आपली भागीदारी वाढवली आहे. NALCO ने एका वर्षात 175 टक्के रिटर्न दिले. तर SAILने गेल्या एका वर्षात 185 टक्के रिटर्न दिले आहेत. झुनझुनवाला यांनी नाल्को ( NALCO)मध्ये आपली हिस्सेदारी वाढवून 1.6 टक्के केली आहे.
6 / 8
झुनझुनवाला यांनी सप्टेंबर महिन्यात वाढवली भागीदारी - राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर महिन्यात SAIL मध्ये आपली भागीदारी 1.76 टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. तर एप्रिल-जून तिमाहीत या शेअर्समध्ये त्यांचा वाटा 1.39 टक्के एवढा होता.
7 / 8
जगभरातील वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने मेटलच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे. यामुळेच झुनझुनवाला यांची होल्डिंग असलेल्या या कंपन्यांच्या शेअर्सना फायदा होत आहे.
8 / 8
नाल्को आणि सेल या दोन्ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत आणि मेटल क्षेत्रात या कंपन्यांचे वर्चस्व आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा समूहाच्या अनेक कंपन्या आहेत. यात त्यांनी मोठी रक्कम गुंतवलेली आहे. अलीकडेच त्यांनी टाटा मोटर्स आणि टाटा कम्युनिकेशन्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या 3 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. याशिवाय त्यांची टाटा मोटर्स (DVR ऑर्डिनरी) मध्येही गुंतवणूक आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजार