वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 12:46 PM2024-11-30T12:46:21+5:302024-11-30T12:54:16+5:30

Mutual Fund Investment : २०२४ मध्ये आतापर्यंत पाच म्युच्युअल फंड श्रेणींनी २५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. पाहा कोणते आहेत हे म्युच्युअल फंड्स.

Mutual Fund Investment : २०२४ मध्ये आतापर्यंत पाच म्युच्युअल फंड श्रेणींनी २५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. व्हॅल्यू रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार, यापैकी तीन कॅटेगरी सेक्टोरल आणि थीमॅटिक आहेत, तर इतर दोन स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंड आहेत. जाणून घेऊया कोणत्या म्युच्युअल फंड प्रकारात किती परतावा मिळाला आहे.

फार्मा फंड : फार्मा फंडांनी यावर्षी सर्वाधिक सरासरी ३३.१६ टक्के परतावा दिला आहे. एचडीएफसी फार्मा अँड हेल्थकेअर फंडानं सर्वाधिक ४१.६० टक्के, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फार्मा हेल्थकेअर अँड डायग्नोस्टिकनं ३९.०२ टक्के परतावा दिलाय.

पीएसयू फंड : सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या (पीएसयू) फंडानं सरासरी २९.७८ टक्के परतावा दिला आहे. सीपीएसई ईटीएफनं या वर्षी सर्वाधिक ३६.५३ टक्के परतावा दिला, तर इन्व्हेस्को इंडिया पीएसयू इक्विटी फंडानं याच कालावधीत ३०.६३ टक्के परतावा दिला.

इन्फ्रास्ट्रक्चर फंड : इन्फ्रास्ट्रक्चर फंडांनी यंदा सरासरी २७.९६ टक्के परतावा दिला आहे. एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंडानं सर्वाधिक ४५.७९ टक्के, तर बंधन इन्फ्रास्ट्रक्चर फंडानं ३८.३२ टक्के परतावा दिला.

स्मॉल कॅप फंड : स्मॉल कॅप फंडांनी सरासरी २५.८२ टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत बंधन स्मॉल कॅप फंडानं सर्वाधिक ४१.६२ टक्के, तर मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप फंडानं ४०.३८ टक्के परतावा दिला.

मिडकॅप फंड : मिडकॅप फंडांनी सरासरी २५.३५ टक्के परतावा दिला आहे. याच कालावधीत मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंडानं सर्वाधिक ४९.४९ टक्के, तर इन्व्हेस्को इंडिया मिडकॅप फंडानं ३८.२८ टक्के परतावा दिला.

(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडांच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)