sbi otp based cash withdrawal protecting customers against fraudsters know details
State Bank चे ग्राहक आहात? या प्रोसेसशिवाय ATM मधून पैसे काढता येणार नाहीत By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 01:40 PM2022-10-04T13:40:45+5:302022-10-04T13:50:04+5:30Join usJoin usNext पाहा नक्की काय आहे ही प्रक्रिया... स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी आणली आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. हे नवीन तंत्रज्ञान वन टाइम पासवर्डच्या एटीएमशी निगडीत आहे. जर ग्राहकाचा मोबाइल क्रमांक स्टेट बँकमध्ये नोंदणीकृत असेल, तर त्याच क्रमांकावर ओटीपी येईल, जो प्रविष्ट केल्यानंतर एटीएममधून पैसे काढता येतील. OTP हा 4 अंकी क्रमांक आहे जो ग्राहकांची पडताळणी करण्यासाठी आणि व्यवहारासाठी वापरला जातो. ओटीपी फसवणुकीपासून संरक्षण करण्यास मदत करेल कारण नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, ज्याच्या मदतीने पैसे काढता येतील. ओटीपीद्वारे, एसबीआयचे ग्राहक एटीएममधून 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम काढू शकतील. एटीएममध्ये केवळ ओटीपीच टाकावा लागत नाही तर त्यासोबत डेबिट कार्डचा पिनही टाकावा लागणार आहे. ही सेवा 1 जानेवारी 2020 पासून SBI ATM मध्ये लागू करण्यात आली आहे. एसबीआयने या सेवेचे वर्णन फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध लसीकरण असे केले आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवणे हे आपले प्राधान्य असल्याचे एसबीआयने म्हटले आहे. OTP वर अवलंबून असलेली ही प्रणाली कशी काम करते ते पाहूया. एसबीआय एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला ओटीपीची आवश्यकता असेल. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओटीपी पाठवला जाईल. हा ओटीपी एका ट्रान्झॅक्शनसाठी वापरता येईल. जेव्हा तुम्ही काढणारी रक्कम स्क्रिनवर दिसेल तेव्हाच तुम्हाला ओटीपी स्क्रिन दिसेल. यानंतर ओटीपी टाकून तुम्हाला पैसे काढता येतील. फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना एटीएमच्या माध्यमातून कार्डलेस कॅश विड्रॉव्हल सुरू करण्याची परवानगी देण्यास सांगितलं होतं. यासोबतच युपीआयचा वापर करत सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कमध्ये कार्डलेस कॅश विड्रॉल सेवा उपलब्ध करून देण्यास सुरूवात झाली आहे. सध्या सर्व बँकांनी ही सुविधा सुरू केलेली नाही. सध्या युपीआयची लोकप्रियताही वाढत आहे. तसंच एटीएममध्येही त्याचा वापर सुरू करण्यात येत आहे. या सुविधेच्या माध्यमातून एटीएम कार्ड नेण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुम्हाला फसवणुकीपासून बचाव करता येईल. तसंच एटीएममध्ये कार्डाचा वापर केला नाही तर तुम्हाला त्याची माहिती चोरी होण्याची भीतीही राहणार नाही. टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाभारतीय रिझर्व्ह बँकState Bank of IndiaReserve Bank of India