Share Market: Invest abroad at home, earn more profit
Share Market: घरी बसून करा विदेशात गुंतवणूक, कमवा अधिक नफा By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 2:01 PM1 / 10बहुराष्ट्रीय कंपन्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करीत असतात. घरी बसून विदेशी कंपन्यांत गुंतवणूक करण्यासाठी एमएनसी फंड हा चांगला पर्याय आहे. 2 / 10आपल्या देशाप्रमाणेच इतर देशांतही व्यवसाय करणाऱ्या या कंपन्या आहेत. यात अधिक परताव्याची शक्यता असते. मागील तीन वर्षांत या फंडांनी सरासरी वार्षिक १२ टक्के परतावा दिला आहे.3 / 10टॉप एमएनसी फंडांचा वार्षिक परतावा आयसीआयसीआय प्रु. एमएनसी २६.१ एसबीआय मॅग्नम ग्लोबल२३.१4 / 10निफ्टी एमएनसी टोटल रिटर्न१९.२ यूटीआय एमएनसी फंड१७.६ आदित्य बिर्ला एमएनसी१३.८ (३ वर्षांतील परताव्याचे आकडे % मध्ये)5 / 10फंडांची वैशिष्ट्ये कोठे करावी गुंतवणूक? : एमएनसी फंडांची गुंतवणूक असलेल्या क्षेत्रांत मागील काही महिन्यांत तेजी असल्याचे दिसून आले आहे. बाजारतज्ज्ञ हर्ष उपाध्याय यांनी म्हटले की, मी एफएमसीजी, इंडस्ट्रियल्स, इंजिनिअरिंग, ऑटो ॲन्सिलिअरी कंपन्यांचे अधिक समभाग खरेदी केले आहेत. यांत तेजी आहे.6 / 10यामुळे आहे उत्तम : एमएनसी फंडांत गुंतवणुकीमुळे उत्तम कंपन्यांत गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदारांस मिळते. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वहीखाते आणि व्यवस्थापन मजबूत असते. जगभरातील अनुभव पाठीशी असल्यामुळे चढ-उतार झेलण्याची त्यांची क्षमता चांगली असते.7 / 10या आहेत उणिवा : भारतीय शेअर बाजारात समभाग सूचीबद्ध करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे फंड व्यवस्थापकांकडे गुंतवणुकीची ठिकाणे कमी असतात. या कंपन्यांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण नसतो.8 / 10गुंतवणूक करायला हवी का? संकल्पनाधिष्ठित असूनही एमएनसी फंडांनी चढ-उताराच्या स्थितीतही चांगला परतावा दिला असल्याचे दिसून आले आहे. एसआयपीच्या माध्यमातून या फंडात गुंतवणूक करणे लाभदायक ठरू शकते. सात वर्षांपर्यंत गुंतवणूक असायला हवी. यात तुम्ही तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करू शकता.9 / 10परदेशातील शेअर बाजारात गुंतवणूक कशी कराल? १ परदेशातील गुंतवणुकीचे खाते आपल्या देशातील ब्रोकरमार्फत उघडून याद्वारे व्यवहार करता येईल.10 / 10२ विदेशी बाजारात गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये युनिट खरेदी करणे. ३ प्रत्यक्ष शेअर बाजारात गुंतवणूक न करता देशी, परदेशी ब्रोकर्सकडून ईटीएफ घेणे. आणखी वाचा Subscribe to Notifications