Share market The Multibagger stock brightcom group share huge down 77% to Rs 24
झरझर चढला अन् धाडकन आदळला! 77% घसरून हा शेअर थेट 24 रुपयांवर आला, गुंतवणूकदार कंगाल! By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 7:51 PM1 / 7ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडचे शेअर्स आज (Brightcom Group Ltd) जबरदस्त आदळले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये आज 5 टक्क्यांचे लोवर सर्किट होते. ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेडचा शेअर 52 आठवड्यांतील नव्या 24.65 रुपयांवर पोहोचला होता. 2 / 7महत्वाचे म्हणजे गेल्या एका वर्षात या शेअरच्या किंमतीत सातत्याने घसरण दिसून येत आहे. यावर्षी YTD मध्ये हा शेअर आतापर्यंत 15% पर्यंत घसरला आहे. या शेअरने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला होता.3 / 7वर्षभरात 77 टक्के नुकसान - हा शेअर 2022 पासून आतापर्यंत दबावात आहे. या शेअरने वर्षभरातच आपल्या गुंतवणूकदारांचे तब्बल 77.12% नुकसान केले आहे. या दरम्यान हा शेअर 108 रुपयांवरून 24.85 रुपयांवर आला आहे. 4 / 7गेल्या महिनाभरात हा शेअर 14.75% ने कोसळला आहे. 6 महिन्यात हा शेअर 48.18% घसला आहे. Brightcom Group Ltd ने 2021 मध्ये जवळपास 2,500% एवढा जबरदस्त परतावा दिला होता. ही कंपनी 2022 मधील भारतातील सर्वात खराब प्रदर्शन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक होती.5 / 7कधीपासून सुरू झालीय शेअरची घसरण? - कंपनीचे काही खुलासे आणि आर्थिक व्यवहार गुंतवणूकदारांसाठी नुकसानदायक ठरल्याचे म्हणत बाजार रेग्युलेटरीने चिंता व्यक्त केल्यानंतर शेअरची विक्री सुरू झाली. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने गेल्या वर्षी ब्राइटकॉमच्या आर्थिक बाबींचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी डेलॉयट टच तोहमात्सु इंडिया एलएलपीची नियुक्ती केली होती. लूथरा अँड लूथरा लॉ ऑफिस इंडियाचे पार्टनर हरीश कुमार यांनी म्हटले आहे, 'सेबीने वेगाने पुढे जाण्याची आणि आपली तपास यंत्रणा मजबूत करमे आवश्यक आहे.'6 / 7ब्राइटकॉम ग्रुपमध्ये शंकर शर्मा यांचाही वाटा - जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीसाठी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांच्याकडे ब्राइटकॉम ग्रुपचे 2.50 कोटी शेअर्स आहेत. जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या 1.24 टक्के एवढे आहेत.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications