शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 9:01 PM

1 / 9
भारतीय शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्सची यादी मोठी आहे. यातील काही शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात तर काहींनी अल्पावधीतच मालामाल केले आहे. असाच एक शेअर आहे संरक्षण डिफेन्स कंपनी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा.
2 / 9
या शेअरने गेल्या 2 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत जवळपास 10 पट वाढ झाली आहे. बुधवारी ट्रेडिंगच्या शेवटी कंपनीचा शेअर बीएसईवर 1.19 टक्क्यांनी वाढून 2088.60 रुपयांवर बंद झाला.
3 / 9
महत्वाचे म्हणजे, ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवालने स्टॉकवरील खरेदी सल्ला कायम ठेवला आहे आणि त्याची टार्गेट प्राइस 2,400 रुपये ठेवली आहे.
4 / 9
गेल्या दोन वर्षांपूर्वी, 9 डिसेंबर 2022 रोजी, झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत केवळ 194 रुपये होती, जीने आता 2,000 रुपयांची पातळी ओलांडली आहे. अर्थ या दोन वर्षांत गुंतवणूकदारांची गुंतवणूक दुप्पट अथवा तिप्पट नव्हे, तर तब्बल 10 पटींनी वाढली आहे.
5 / 9
जर एखाद्या गुंतवणूकदारांने 5 वर्षांपूर्वी झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती तर आता तिचे मुल्य 10 लाख रुपये एवढे झाले असते.
6 / 9
शेअरची कामगिरी - झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सच्या कामगिरीचा विचार करता, हा शेअर गेल्या एका आठवड्यात 13.71 टक्क्यांनी वधारला आहे. तर त्यात गेल्या एका महिन्यात 17.44 टक्क्यांची वाढ झाली आहे.
7 / 9
गेल्या 3 महिन्यांचा विचार करता या शेअरमध्ये 29.53 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या वर्षी हा शेअर 162.85 टक्क्यांनी वधारला आहे. तर गेल्या 3 वर्षांत हा शेअर 837.64 टक्क्यांनी वधारला आहे.
8 / 9
कंपनीचे मार्केट कॅप 17,553 कोटी रुपये - मल्टीबॅगर स्मॉलकॅप स्टॉक झेन टेक्नॉलॉजीजचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹2,120 एवढा आहे. तर नीचांकी किंमत 687.70 रुपये आहे. याशिवाय, कंपनीचे मार्केट कॅप 17,553 कोटी रुपये एवढे आहे.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMonkeyमाकड