शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलियोतील 'या' 2 स्‍टॉक्‍सनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 वर्षात वाढली तीनपट संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 2:42 PM

1 / 11
शेअर बाजारातील अनेक छोटे-मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा पोर्टफोलिओ पाहूनच गुंतवणुकीचे धोरण ठरवतात. झुनझुनवाला, यांना शेअर बाजारातील 'बिग बुल' म्हणून ओळखले जाते. ते, भविष्यात ज्यांचे रिटर्न्स दमदार असू शकतात, असे शेअर्स निवडत असतात.
2 / 11
झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सवर नजर टाकली असता, असे अनेक स्टॉक्स आहेत, ज्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 3 पट परतावा दिला. आम्ही येथे अशाच 2 शेअर्ससंदर्भात माहिती देत ​​आहोत.
3 / 11
Man Infraconstruction आणि Orient Cement Ltd स्‍टॉक्‍समध्ये एका वर्षात गुंतवणूकदारांची संपत्ती तिप्पट वाढली आहे. (Rakesh Jhunjhunwala Portfolio Stocks)
4 / 11
Man Infraconstruction - यावर्षी बांधकाम कंपनी मॅन इन्फ्राकंस्ट्रक्शनचे (Man Infraconstruction) शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर सिद्ध झाले आहेत. गेल्या एक वर्षात शेअरने गुंतवणूकदारांना 330 टक्के एवढे प्रचंड रिटर्न दिले आहेत. आतापर्यंत गेल्या एक वर्षात या शेअर्सचा भाव 22 रुपयांवरून (14 डिसेंबर 2020) 95 रुपयांपर्यंत (13 डिसेंबर 2021) पोहोचला आहे.
5 / 11
Man Infraconstruction मध्ये राकेश झुनझुनवाला यांचा जवळपास 1.2 टक्के एवढा वाटा आहे. त्यांनी सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या होल्डिंगमध्ये कसल्याही प्रकारचा बदल केलेला नाही.
6 / 11
झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे 3,000,000 शेअर्स आहेत. या शेअर्सची सध्याची किंमत 28.4 कोटी रुपये एवढी आहे. मॅन इन्फ्राकंस्ट्रक्शनच्या स्‍टॉक्‍समध्ये 13 डिसेंबरला 0.73 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली.
7 / 11
Orient Cement Ltd - ओरिएंट सिमेंटच्या (Orient Cement) शेअरनेही गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांची संपत्ती दुप्पट केली आहे. गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 116 टक्के एवढा परतावा दिला आहे.
8 / 11
या एक वर्षा दरम्यान Orient Cement Ltd च्या शेअरची किंमत 77.95 रुपयांवरून (14 डिसेंबर 2020) 168 रुपयांवर (13 डिसेंबर 2021) पोहोचली आहे.
9 / 11
ओरिएंट सिमेंटमध्ये राकेश झुनझुनवाला यांची सुमारे 1.2 टक्के एवढी भागीदारी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांनी कंपनीच्या होल्डिंगमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. त्यांच्याकडे कंपनीचे 2,500,000 शेअर्स आहेत. याचे सध्याचे मूल्य सुमारे 41.8 कोटी रुपये एवढे आहे. गेल्या 13 डिसेंबर रोजी कंपनीच्या स्टॉक्समध्ये 1.36 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
10 / 11
महत्वाचे म्हणजे, राकेश झुनझुनवाला कोणताही स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करण्यापूर्वी त्याचा संपूर्ण अभ्यास करतात. यामुळेच त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सामील असलेल्या अनेक स्टॉक्सनी सातत्याने चांगला परतावा दिला आहे.
11 / 11
(नोट : येथे केवळ स्‍टॉक्‍सच्या गेल्या 1 वर्षातील परफॉर्मेन्सची माहिती दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाshare marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक