शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Success Story : एकेकाळी अमिताभ बच्चन यांचे CA म्हणून केलं काम; नंतर नशीब चमकलं, आता अब्जाधीशांमध्ये येतं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 8:46 AM

1 / 8
Success Story Premchand Godha: जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल अपार मेहनतीशिवाय पर्याय नाही. अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी शून्यातून आपलं जग निर्माण केलं आहे. आज आपण अशा व्यक्तीची यशोगाथा जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकेकाळी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचे सीए म्हणून काम केलंय. परंतु आता त्यांचं नाव भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये घेतलं जातं.
2 / 8
राजस्थानमधील शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रेमचंद गोधा आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी इप्का लॅबोरेटरीजसारख्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपनीचं अध्यक्षपद मिळवले. गोधा यांनी यापूर्वी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबासाठी चार्टर्ड अकाउंटंट (CA) म्हणून काम केलं होतं. १९७५ मध्ये त्यांनी बच्चन कुटुंबासोबत मिळून संघर्ष करत असलेल्या इप्का लॅबोरेटरीजला नवसंजीवनी दिली.
3 / 8
त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीचं उत्पन्न ५४ लाख रुपयांवरून ४,४२२ कोटी रुपयांवर पोहोचलं. बच्चन कुटुंबानं १९९९ मध्ये आपला हिस्सा विकला, पण गोधा हे कंपनीसोबतच राहिले आणि आज ही कंपनी २८,००० कोटी रुपयांची कंपनी बनली. फायनान्शिअल एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार, गोधा यांची वैयक्तिक संपत्ती १०,८०० कोटी रुपयांपेक्षा (सुमारे १.३ अब्ज डॉलर) पेक्षा जास्त आहे. प्रेमचंद गोधा यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ.
4 / 8
राजस्थानमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गोधा यांना आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. पण, त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांची मेहनत आणि समर्पण त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन गेले. गोधा यांनी सुरुवातीला अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक व्यवहार हाताळले. या काळात त्यांना फायनान्शिअल मॅनेजमेंटचा सखोल अनुभव आला.
5 / 8
१९७५ हे वर्ष प्रेमचंद गोधा यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. बच्चन कुटुंबासह त्यांनी इप्का लॅबोरेटरीजमध्ये गुंतवणूक केली. त्यावेळी कंपनी कठीण काळातून जात होती. मात्र, गोधा यांचं नेतृत्व आणि व्यावसायिक कौशल्यामुळे कंपनीचा कायापालट झाला. त्यांनी कंपनीला नवी दिशा देत नफ्याच्या वाटेवर आणलं. त्यांच्या नेतृत्वाखाली इप्का लॅबोरेटरीजनं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीत आपला भक्कम ठसा उमटवला. कंपनी आज मधुमेह, हृदयरोग, पेन किलर आणि मलेरिया सारख्या आजारांच्या उपचारांसाठी औषधं तयार करते.
6 / 8
बच्चन कुटुंबानं १९९९ मध्ये स्वत:च्या आर्थिक अडचणींमुळे इप्का लॅबोरेटरीजमधील आपला हिस्सा विकला. परंतु, गोधा याच कंपनीतच राहिले. त्यांनी कंपनीच्या वाढीसाठी काम केलं. त्यांना त्यात आणखी यश मिळालं. त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वक्षमतेमुळे इप्का लॅबोरेटरीज आज २८ हजार कोटी रुपयांची मोठी कंपनी बनली आहे.
7 / 8
फायनान्शिअल एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, गोधा यांची एकूण संपत्ती १०,८०० कोटी रुपयांहून अधिक आहे. ही रक्कम सुमारे १.३ अब्ज डॉलर इतकी आहे. गोधा यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
8 / 8
मेहनत, चिकाटी आणि दूरदृष्टीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे यातून सिद्ध होतं. गोधा यांचा सीएस ते भारतातील एका आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपनीचे प्रमुख असा प्रवास आहे. हे भारताच्या उद्योजकतेच्या भावनेचं प्रतिबिंब आहे आणि नवउद्योजकांसाठी प्रेरणाही आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीAmitabh Bachchanअमिताभ बच्चन