tata group tata motors jumps nearly 180 percent in 2021 rakesh jhunjhunwala increase investment
TATA ची कमाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले १ वर्षात १८० टक्के रिटर्न; Rakesh Jhunjhunwala चीही मोठी गुंतवणूक By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 12:16 PM1 / 12आताच्या घडीला शेअर मार्केटची विक्रमी घोडदौड कायम आहे. अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO सादर होत आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची उत्तम संधी मिळत असून, अनेकविध कंपन्या उत्तम रिटर्न्स देऊन गुंतवणूकदारांना मालामाल करत आहेत. 2 / 12यामध्ये TATA ग्रुपचा समावेश असून, कोरोना संकटाच्या काळातही टाटा ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी कमाल कामगिरी करत गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. TATA च्या या कामगिरीमुळे Rakesh Jhunjhunwala यांनीही टाटाच्या कंपन्यांमधील गुंवतणूक वाढवली आहे. 3 / 12TATA ग्रुपमधील ऑटोमोबाइल क्षेत्रात कार्यरत असणारी ही आघाडीची कार निर्माता कंपनी म्हणजे Tata Motors. आताच्या घडीला इलेक्ट्रॉनिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स सर्वांत आघाडीवर असून, टाटाच्या इलेक्ट्रिक कार प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. 4 / 12भारतीय बाजारपेठे प्रमाणे Tata Motors शेअर मार्केटमध्येही दमदार कामगिरी करताना दिसत आहे. टाटा मोटर्सच्या शेअरने एका वर्षांत १८० टक्क्यांची वाढ नोंदवत भरघोस रिटर्न दिले आहे. यामुळे गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत. 5 / 12Tata Motors च्या शेअर्समध्ये Rakesh Jhunjhunwala यांचीही मोठी गुंतवणूक असून, कंपनीमध्ये १.११ टक्के हिस्सा राकेश झुनझुनवाला यांचा आहे. याची किंमत साधारणपणे १ हजार ७९६ कोटी आहे. 6 / 12Tata Motors चा शेअर निफ्टी५० मध्ये सर्वांत उत्तम रिटर्न देणारा ठरला आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांत कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. सन २०२२ मध्ये टाटा मोटर्स यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल, असे म्हटले जात आहे. 7 / 12दरम्यान, शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक सूचीबद्ध कंपन्या TATA ग्रुपच्या आहेत. आतापर्यंत अनेकविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या TATA ग्रुपच्या एकूण २९ कंपन्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या आहेत. मार्केट कॅपमध्ये क्रमांक एक वर असलेल्या TATA ग्रुपचा मार्केट कॅप २१.९९ लाख कोटींवर गेला आहे. 8 / 12TATA ग्रुपचा मार्केट कॅप २३.६९ लाख कोटींवर होता. मात्र, त्यात १.७० लाल कोटींची घसरण झाली. TATA ग्रुपमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या कंपनीचा शेअर सर्वाधिक असून, टीसीएसचा मार्केट कॅप १२.८० लाख कोटी आहे. यानंतर टायटन कंपनीचा मार्केट कॅप दुसऱ्या क्रमांकावर आहे. Titan चा मार्केट कॅप २.२९ लाख कोटी आहे. शेअर मार्केटमधील सूचीबद्ध ग्रुपचे एकूण मार्केट कॅप २७४ लाख कोटींवर आहे. 9 / 12दरम्यान, Tata Motors देशातील सर्वात मोठी आणि मार्केट लीडर मारुती सुझुकीपेक्षाही (Maruti Suzuki) प्रति कार जास्त नफा कमवतेय. १० वर्षात पहिल्यांदाच टाटा मोटर्सने प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनीला मागे टाकले आहे.10 / 12गेल्या १० वर्षात पहिल्यांदाच टाटा मोटर्सने प्रति कार नफ्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठ्या कार निर्माता कंपनीला मागे टाकले. सन २०१६ ते २०२१ पर्यंत, टाटाने शानदार कार लाँच केल्यात, त्यापैकी काही त्यांच्या सेगमेंटमधील बेस्ट सेलर आहेत. तसेच, TATA हा एकमेव भारतीय ब्रँड आहे ज्याकडे देशात नेक्सॉन, अल्ट्रोझ आणि पंच या तीन ५ स्टार रेटेड कार आहेत.11 / 12Tata Motors इलेक्ट्रिक सेगमेंटमध्येही लीडर म्हणून समोर येत आहे. कंपनीची इलेक्ट्रिक एसयूव्ही कार Tata Nexon EV भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही एसयूव्ही ३१२ किमीपर्यंतची जबरदस्त ड्रायव्हिंग रेजे देते. अलीकडेच कंपनीने Tigor EVs सुद्धा लाँच केलीये.12 / 12आगामी काळात इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांचा विभाग वाढवण्यावर कंपनीचा 'फोकस' राहणार असून नुकतीच १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याद्वारे येत्या ४ ते ५ वर्षामध्ये टाटा अजून १० नवीन इलेक्ट्रिक वाहने भारताच्या बाजारात उतरवेल, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications