tata group telecom services ttml stock has zoomed over 1000 percent in one year
TATA ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! ‘या’ कंपनीने वर्षभरात दिले छप्परफाड रिटर्न; १० हजाराचे झाले १ लाख, पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 4:05 PM1 / 9गेल्या अनेक दिवसांपासून TATA ग्रुप अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. टाटा ग्रुपमधील अनेक कंपन्या शेअर मार्केटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत असून, गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देत आहेत. 2 / 9आताच्या घडीला शेअर मार्केट सार्वकालिक उच्चांकावर असून, टाटाच्या अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यातच आता TATA ग्रुपच्या आणखी एका कंपनीची भर पडली आहे. तज्ज्ञांच्या मते, या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना एक हजार टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. 3 / 9TATA ग्रुपमधील ही कंपनी म्हणजे टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (TTML) आहे. TTML च्या या कंपनीचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सतत तेजीत असून, सलग तीन दिवस ५ टक्क्यांचे सर्किट लागत असल्याचे सांगितले जात आहे. आताच्या घडीला या कंपनीचे शेअर्स ८०.०५ रुपयांवर आहे. 4 / 9तज्ज्ञांच्या मते, TTML कंपनीतील तेजी आणखी काही दिवस अशीच कायम राहू शकते. तसेच या स्तरावरील शेअर्समुळे नफावसुलीही पाहायला मिळू शकते, असे सांगितले जात आहे. TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची सब्सिडियरी कंपनी आहे. 5 / 9TTML आपल्या सेगमेंटमधील आघाडीवर असणारी कंपनी आहे. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेकविध बड्या कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात या कंपनीने स्मार्ट इंटरनेट बेस सर्व्हिस कंपनी सुरू केली असून, याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. 6 / 9TTML कंपनीच्या शेअर्सची किंमत १७ नोव्हेंबर २०२० रोजी केवळ ९ रुपये होती. त्यावेळी १२ हजार रुपयांमध्ये १३३४ शेअर्स मिळाले असते आणि आता १७ नोव्हेंबर रोजी त्याचीच किंमत १.१ लाख रुपये झाली, असे सांगितले जात आहे. 7 / 9याशिवाय या कंपनीने सुरू केलेल्या स्मार्ट इंटरनेट सर्व्हिसेसमध्ये फास्ट इंटरनेट तसेच क्लाउड बेस्ड सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि ऑप्टोमाइज्ड कंट्रोल देण्यात येत आहे. हीच सुविधा ग्राहकांना प्रचंड आवडली असल्याचे म्हटले जात आहे.8 / 9तसेच TTML कंपनीचे कमाई दिवसेंदिवस वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सहा महिन्यांत कंपनीचा तोटा १४१० कोटींनी घसरून ६३२ कोटींवर आला आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा हिस्सा सर्वाधिक असून, कंपनीसाठी ही बाब चांगली आहे, असे म्हटले जात आहे. 9 / 9TTML मध्ये Tata Sons चा ७४.३ टक्के हिस्सा आहे. तर रिटेल गुंतवणूकदारांचा या कंपनीतील हिस्सा २६.६ टक्के आहे. टाटा सन्स या कंपनीसंदर्भात मोठी योजना आखत असून, भविष्यात या कंपनीला Tata Tele Business Services (TTBS) नावाने लॉंच केले जाऊ शकते, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications