Tata group to sell 70-year-old company voltas; A market cap of around 27000 crores
टाटा समूह 70 वर्षे जुनी कंपनी विकणार; सूमारे 27000 कोटींचे मार्केट कॅप By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:40 PM2023-11-07T16:40:17+5:302023-11-07T16:46:28+5:30Join usJoin usNext या कंपनीची सुरुवात 1954 मध्ये झाली होती. Tata Group: देशातील सर्वात मोठ्या उद्योग समुहापैकी एक असलेला टाटा समूह, आपला होम अप्लायन्स व्यवसाय बंद करण्याचा विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, टाटा समूहाने आपली जवळपास 70 वर्षे जुनी कंपनी 'व्होल्टास' विकण्याची तयारी सुरू केली आहे. जाणकारांच्या मते, कंपनी व्यवस्थापनाला असे वाटते की, ही बाजारपेठ खूपच स्पर्धात्मक झाली आहे. हा व्यवसाय पुढे नेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामुळेच टाटा समूहाचे व्यवस्थापन, हा व्यवसाय विकण्याबाबत चर्चा करत आहेत. कंपनी विकण्याची चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. टाटा समूह दीर्घ मुदतीसाठी मालमत्ता स्वतःकडे ठेवण्याचा निर्णयही घेऊ शकतो. या बाबत अद्याप टाटा समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. चालू वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 3.3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे 27 हजार कोटी रुपये आहे. 1954 मध्ये सुरू झालेली व्होल्टास कंपनी एअर कंडिशनर, वॉटर कूलर, व्यावसायिक रेफ्रिजरेशन युनिट्स तयार करते. कंपनीचा भारत, मध्य पूर्व, दक्षिण पूर्व आशिया आणि आफ्रिकेमध्ये व्यवसाय आहे. कंपनीचा भारतात Arcelic सोबत संयुक्त उपक्रम देखील आहे आणि त्यांनी देशांतर्गत बाजारात व्होल्टास बेको ब्रँड अंतर्गत घरगुती उपकरणांची श्रेणी देखील लॉन्च केली आहे. Voltas Beco ने चालू आर्थिक वर्षात सुमारे 96.7 अब्ज रुपये ($1.2 बिलियन) कमाई केली. कंपनीच्या दुसऱ्या तिमाही अहवालानुसार, 30 सप्टेंबरपर्यंत रेफ्रिजरेटर मार्केटमध्ये व्होल्टास बेकोचा वाटा 3.3 टक्के आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये 5.4 टक्के होता. आज कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात घट दिसून येत आहे. BSE कडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, शेअर 1.68 टक्क्यांच्या घसरणीसह 813.50 रुपयांवर व्यवहार करत आहे. मात्र, आज कंपनीच्या शेअरनेही दिवसभरातील 812 रुपयांची खालची पातळी गाठली. कंपनीचे शेअर्स आज रु. 827.90 वर उघडले. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 933.50 रुपये आहे, जो 3 मार्च 2023 रोजी दिसला होता. तर 27 जानेवारी रोजी कंपनीने 737.60 रुपयांची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती.टॅग्स :टाटागुंतवणूकरतन टाटाव्यवसायTataInvestmentRatan Tatabusiness