Tatas, Reliance, Birla most trusted groups amongst the investors, finds poll
Tata Group : टाटा की मुकेश अंबानींची रिलायन्स? किती विश्वासू आहेत या कंपन्या, जाणून घ्या सर्व्हेचा निकाल By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 11:20 AM1 / 9कोरोनाच्या संकटात मोठमोठ्या कंपन्यांनी भारताला मदत देऊ केली. यामध्ये टाटा, विप्रो, रिलायन्स सारख्या स्वदेशी कंपन्यांचा मोठा वाटा आहे. या कंपन्यांवर भारतीय किती विश्वास ठेवतात, म्हणजेच या कंपन्यांची उत्पादने किती विश्वासू आहेत हे लोकांनी सांगितले आहे. (Tata Group has emerged as most trusted by investors after corona.)2 / 9पंधरवड्यापूर्वी विदेशी ब्रँड असलेल्या फोर्डने भारतातून काढता पाय घेतला. एकेकाळी लुटालूट करणारी कंपनी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या फोर्डला परत भारतीयांचा विश्वास संपादन करता आला नाही. त्याची परिणती अशी झाली की कंपनीच्या कार काही शे मध्ये विकाल्या जात होत्या. ज्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याशीही कंपनीने दुसऱ्यांदा गद्दारी केली आहे. 3 / 9काही दिवसांपूर्वी देशातील १७ कार्पोरेट घराण्यांबाबत एक सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये रिलायन्स नाही तर टाटा ग्रुप सर्वात विश्वासार्ह ग्रुप असल्याचे लोकांनी सांगितले. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी म्हणजे दुपटीहून अधिक होती. 4 / 9टाटा स्टीलला गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विश्वास मिळाला. गेल्या वर्षी ही विश्वासार्हता ३२टक्के होती. यंदा ती ६६ टक्क्यांवर गेली आहे. 5 / 9इक्विटी मास्टरद्वारे हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये १५३ वर्षे जुना बिर्ला आणि मुकेश अंबानींचा रिलाय्नस समूहदेखील सहभागी करण्यात आला आहे. या दोन्ही समुहांना अनुक्रमे पाच आणि ४.७ गुण मिळाले असून ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 6 / 9महत्वाचे म्हणजे कोणत्याही कंपनीला ५ पेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. मात्र, २०१३ पेक्षा वरची रँक या कंपन्यांना मिळाली आहे. most trusted group of India Is TATA.7 / 9या सर्व्हेमध्ये 5274 गुतवणूकदारांची मते घेण्यात आली आहेत. या उद्योग समुहांच्या विश्वसनियतेवर हा सर्व्हे घेण्यात आला आहे. बिर्ला, गोदरेज, टीव्हीएस हे गेल्या वेळच्या तुलनेत दोन रँक वर आले आहेत. मुकेश अंबानींची कंपनी सहा रँक आणि बजाज समूह चौथ्या क्रमांकावर असून गेल्यावेळपेक्षा सहा रँक वर आहे.8 / 9२०१३ मध्ये चार टक्के गुंतवणूकदारांनी नोटाला मत दिले होते. यंदा नोटाचे प्रमाण हे दोन टक्के राहिले आहे, आरपीजी (राम प्रसाद गोएँका) ग्रुपला (0.8 टक्के ) मते मिळाली आहेत. विजेती टाटा आणि अन्य ग्रुपमध्ये मोठे अंतर आहे. 9 / 9इक्विटी मास्टरचे उप प्रमुख राहुल शाम यांनी सांगितले की, कोणत्याही कंपनीसाठी ग्राहकांचा विश्वास आणि प्रतिष्ठा महत्वाची असते. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो. ज्याचा फायदा दीर्घकालीन असतो. यामुळे सर्व कार्पोरेट घराण्यांना आपली प्रतिष्ठा वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications