शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘वित्तीय भेट’ ही संकल्पनाच नावीन्यपूर्ण, नाताळमध्ये आपल्या लोकांना काय द्याल गिफ्ट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 9:41 AM

1 / 6
नाताळचा सण तोंडावर आलेला आहे. नाताळात सांताक्लॉजकडून भेटवस्तू मिळत असतात. प्रियजनांना भेटवस्तू देण्याचीही प्रथा आहे. यंदाच्या नाताळात तुम्ही आपल्या प्रियजनांना वित्तीय भेट देऊ शकता. ‘वित्तीय भेट’ ही संकल्पनाच नावीन्यपूर्ण आहे. मात्र, ही भेट प्रियजनांना दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा देऊ शकते. पाच प्रकारच्या वित्तीय भेटी आप्तेष्टांना देता येऊ शकतात.
2 / 6
आरोग्य विमा : आरोग्य सुरक्षा हा अलीकडे खर्चिक विषय झाला आहे. रुग्णालयाच्या बिलांमुळे खिसा रिकामा होतो. अनेकदा एवढा खर्च होतो की, अख्खे कुटुंब हवालदिल होते. आरोग्य विमा हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आपल्या कुटुंबासाठी आरोग्य विमा खरेदी करून तुम्ही प्रियजनांना नाताळाची सर्वोत्तम भेट देऊ शकता.
3 / 6
मुदत ठेव : फिक्स्ड डिपॉझीट म्हणजेच मुदत ठेव हे सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक साधन आहे. त्यामुळे ते आपल्या प्रियजनांच्या वित्तीय सुरक्षेसाठी सर्वोत्तम भेट ठरू शकते. मुदत ठेवींवर व्याजदरही चांगला मिळतो. याची एकच उणीव आहे की, त्यात महागाईशी सामना करण्याची क्षमता नाही.
4 / 6
म्युच्युअल फंड : मुलांना भेट देण्यासाठी काही खास म्युच्युअल फंड योजना उपयुक्त आहेत. त्यात शिक्षण आणि लग्न यांसारख्या प्रमुख कारणांसाठी लागणारा खर्च भागविता येईल, अशी सुविधा असते. मुलांचे गिफ्ट फंड हे हायब्रिड किंवा बॅलन्स्ड म्युच्युअल फंड श्रेणीत येतात. यासाठी एसआयपी योजना अधिक उपयुक्त आहेत.
5 / 6
सुवर्ण रोखे : सोने भेट देणे हे आपल्या देशात सर्वाधिक चांगले समजले जाते, पण यंदाच्या नाताळात प्रत्यक्ष सोन्याऐवजी तुम्ही सॉव्हरिन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड सेव्हिंग फंड भेट देऊ शकता. याद्वारे गुंतवणुकीचा उद्देशही सफल होईल.
6 / 6
समभाग : एखाद्या कंपनीचे समभाग आपल्या प्रियजनांना भेट देणे हा एक चांगला पर्याय आहे. तुमच्या प्रियजनांसोबतच तुमच्यासाठीही ही बाब फायदेशीर आहे. समभागांची किंमत वाढल्यानंतर त्यातून जे उत्पन्न मिळेल, त्यावर कर भरण्याची गरज राहणार नाही. त्यात एकदम मोठी गुंतवणूक न करता एसआयपीच्या माध्यमातून दरमहा गुंतवणूक अधिक सोयीस्कर ठरते.
टॅग्स :Investmentगुंतवणूक