These are the biggest scams in banks in India
हे आहेत भारतातील बँकांमध्ये झालेले मोठे घोटाळे By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 11:42 PM1 / 6सध्या पीएमसी बँकेमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार चर्चेत आहे. आर्थिक अनियमिततेमुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंंध लादल्याने अनेक ठेवीदारांचे लाखो रुपये पीएमसी बँकेत अडकले आहे. केवळ पीएमसी बँकच नव्हे तर भारतातील अनेक बँकांमध्ये आतापर्यंत मोठे घोटाळे झाले आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. 2 / 6आयसीआयसीआय बँकेमध्ये सर्वाधिक म्हणजे 6,811 घोटाळ्याची प्रकरणे उघड झाली आहेत. त्यामधून बँकेला सुमारे 50 अब्ज रुपयांचा फटका बसला आहे. 3 / 6देशातील सर्वाधिक मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियालाही घोटाळ्यांचा फटका बसला आहे. स्टेट बँकेमध्ये घोटाळ्यांची 6,793 प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामधून बँकेचे सुमारे 237 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. 4 / 6एचडीएफसी बँकेमध्ये घोटाळ्यांची 2,497 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामधून 12 अब्ज रुपयांचे नुकसान झाले आहे. 5 / 6बँक ऑफ बडोदामधून घोटाळ्यांची 2,160 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामधून बँकेला 287 अब्ज रुपयांचा फटका बसला आहे. 6 / 6अॅक्सिस बँकेमधून घोटाळ्यांची 1,944 प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामधून बँकेचे 53 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications