'These' items are cheap before the budget!
अर्थसंकल्पाआधीच 'या' वस्तू झाल्या स्वस्त ! By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 6:40 PM1 / 9जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत कर कमी करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत 53 सेवांच्या दरात कपात केली आहे. 2 / 9पिण्याच्या पाण्याच्या 20 लिटरच्या बॉटलवरचाही जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणला आहे. 3 / 9मोठ्या आणि मध्यम आकाराच्या सेकंड हँड कार तथा एसयूव्हीवर लावण्यात आलेला 28 टक्के जीएसटी आता 18 टक्क्यांवर नेण्यात आला आहे. 4 / 9एलपीजी गॅसवरचा जीएसटीसुद्धा 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर आला आहे. 5 / 9सिंचन उपकरणांवरचाही 18 टक्क्यांवरचा जीएसटी दर 12 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. 6 / 9 बायो डिझेलवरचा जीएसटी दर 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. 7 / 9साखरेचे पदार्थ आणि बिस्किटांवरचा जीएसटीही 18 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत आला आहे. 8 / 928 हातमाग वस्तूंवरचा जीएसटी दर शून्य टक्क्यांवर नेला आहे. 9 / 9मखमली फॅब्रिकवरचा जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर नेला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications