शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात परतावा! 6 वरून 600 रुपयांवर पोहोचला शेअर, 1 लाखाचे झाले 1 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 8:28 PM

1 / 8
इंडस्ट्रिअल प्रॉडक्ट्स बिझनेसशी संबंधित एका कंपनीच्या शेअरने जबरदस्त परतावा दिला आहे. या कंपनीचे नाव आहे, एचएलई ग्लासकोट (HLE Glascoat). यापूर्वी या कंपनीचे नाव स्विस ग्लासकोट (Swiss Glascoat) असे होते.
2 / 8
या कंपनीचा शेअर गेल्या काही वर्षांत 6 रुपयांवरून 600 रुपयांवर पोहोचला आहे. एचएलई ग्लासकोटच्या शेअरने या काळात गुंतवणूकदारांना 10000 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 1344 रुपये आहे.
3 / 8
1 लाखाचे झाले 1 कोटी रुपये - HLE Glascoat चा शेअर 19 डिसेंबर 2013 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 6.11 रुपयांवर होते. तो 19 डिसेंबर 2022 रोजी 668.10 रुपयांवर व्यवहार करत आहे. HLE Glasscoat च्या शेअरने गेल्या 9 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 10815% एवढा बम्पर परतावा दिला आहे.
4 / 8
जर एखाद्या वक्यक्तीने 19 डिसेंबर 2013 रोजी एचएलई ग्लासकोटच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती आतापर्यंत कायम ठेवली असती, तर आता त्याचे तब्बल 1.09 कोटी रुपये झाले असते.
5 / 8
5 वर्षांत कंपनीने दिला 1650 टक्क्यांचा परतावा - एचएलई ग्लासकोटच्या शेअरने गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 1650 टक्क्यांचा परतावा दिला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 22 डिसेंबर 2017 रोजी कंपनीचा शेअर 37.98 रुपयांवर होता. तो आज 19 डिसेंबर 2022 रोजी BSE वर 668.10 रुपयांवर व्यवहार करत आहेत.
6 / 8
एचएलई ग्लासकोटच्या शेअर्सची 52 आठवड्यांतील लो लेव्हल 601 रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 4548 कोटी रुपये एवढे आहे.
7 / 8
सुरुवातीपासून आतापर्यंत 36000 टक्क्यांहून अधिकचा परतावा - एचएलई ग्लासकोटच्या शेअर्सनी सुरुवातीपासून ते आतापर्यंत 36,378 टक्के एवढा परतावा दिला आहे. 29 सप्टेंबर 2006 रोजी कंपनीचा शेअर BSE वर 1.82 रुपयांवर होता. तो आता 19 डिसेंबर 2022 रोजी 668.10 रुपयांवर पोहोचला आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक