शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या उद्योगपतींना देश कायम लक्षात ठेवेल! राकेश झुनझुनवाला, सायरस मिस्त्री यांच्यासह 'या' 5 उद्योगपतींनी सोडले जग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 5:55 PM

1 / 7
2022 वर्षात देशाने 5 मोठ्या उद्योगपतींचे निधन झाले आहे. हे 5 व्यक्तींचे उद्योग जगतात मोठे काम होते. यात बिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्यासह बजाज इडस्ट्रीचे राहुल बजाज यांचाही समावेश आहे.
2 / 7
वर्ष 2022 च्या सुरुवातीलाच 12 फेब्रुवारी 2022 रोजी बजाज समुहाचे मानद चेअरमन राहुल बजाज यांचे निधन झाले. 1965 मध्ये त्यांनी बजाज समुहाची सुरुवात केली. राहुल बजाज हे ८३ वर्षाचे होते.
3 / 7
पालोनजी मिस्त्री (मृत्यू: 28 जून 2022) बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष असलेले पल्लोनजी मिस्त्री देखील यावर्षी पंचतत्वात विलीन झाले. त्यांनी आयरिश महिलेशी लग्न केले आणि त्यानंतर ते आयर्लंडचे नागरिक झाले. मात्र, त्यानंतरही ते मुंबईतील वक्श्‍वर येथील समुद्रकिनारी असलेल्या बंगल्यात भारतातच राहिले.
4 / 7
राकेश झुनझुनवाला (मृत्यू: 14 ऑगस्ट 2022) भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे या वर्षी ऑगस्टमध्ये वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले. ते बिगबुल म्हणून प्रसिद्ध होते. राकेश झुनझुनवाला यांनी 1985 साली शेअर बाजारमध्ये प्रवेश केला, राकेश झुंझुवाला हे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक उदाहरण राहिले.
5 / 7
सायरस मिस्त्री (मृत्यू: 4 सप्टेंबर 2022) 2022 हे वर्ष पालोनजी शापूरजी कुटुंबासाठी सर्वात वाईट ठरले. जूनच्या पहिल्या महिन्यात पल्लोनजी मिस्त्री यांचे निधन झाले आणि कुटुंब त्याच्या दुःखातून सावरले नाही, सप्टेंबरमध्ये टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे एका वेदनादायक रस्ता अपघातात निधन झाले. गुजरातहून परतत असताना त्यांची मर्सिडीज कार महाराष्ट्राला लागून असलेल्या पालघरमध्ये दुभाजकाला धडकली आणि या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. सायरस मिस्त्री हे टाटा सन्सचे सहावे आणि सर्वात तरुण चेअरमन होते.
6 / 7
विक्रम एस. किर्लोस्कर (मृत्यू: 29 नोव्हेंबर 2022) 90 च्या दशकात जपानी कार कंपनी टोयोटा भारतात आणणारे किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांचे गेल्या महिन्यात नोव्हेंबर 2022 मध्ये निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले.
7 / 7
विक्रम किर्लोस्कर यांनी 90 च्या दशकात जपानी कार कंपनी टोयोटा भारतात आणली होती. देशभरात ही कार तेव्हा चर्चेत आली होती.
टॅग्स :businessव्यवसायTataटाटा