शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPI ट्रांजक्शनला सुरक्षित बनवते स्पॅम फिल्टर, फसवणूक टाळण्यासाठी 'या' पद्धती फॉलो करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 8:42 PM

1 / 7
नवी दिल्ली : भारतात डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) ट्रेंड वाढत आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरला जाणारा डिजिटल पेमेंट मोड म्हणून उदयास आला आहे. यूपीआयच्या लोकप्रियतेसोबतच यामध्ये फसवणूकही वाढत आहे. अशा परिस्थितीत यूपीआय वापरताना काळजी घेतली पाहिजे.
2 / 7
बर्‍याच यूपीआय अॅप्समध्ये स्पॅम फिल्टर असतो, जो विशिष्ट यूपीआय आयडींवरील पेमेंट रिक्वेस्टला ट्रॅक करतो. हे फिल्टर स्पॅम आयडींमधून आलेल्या पेमेंट रिक्वेस्ट ट्रॅक करू शकतात. अशा रिक्वेस्ट आल्यावर यूपीआय अॅप वॉर्निंग देते. यू अॅपमध्ये सुरक्षिततेसाठी स्पॅम फिल्टर नेहमी चालू ठेवा. दुसऱ्या टोकाची व्यक्ती फसवणूक नाही, याची 100 टक्के खात्री असतानाच व्यवहाराला पुढे जा.
3 / 7
1) अनोळखी मोबाइल नंबर आणि युजर्सपासून सावध राहा. 2) यूपीआयद्वारे पैसे मिळवण्याच्या लोभापोटी यूपीआय पिन कोणाला शेअर किंवा सांगू नका. 3) अज्ञात पेमेंट रिक्वेस्ट स्वीकारू नका. 4) फेक यूपीआय अॅपपासून सावध राहा. 5) तुमचा 4 किंवा 6 अंकी यूपीआज पिन कधीही अनोळखी व्यक्तींसोबत शेअर करू नका.
4 / 7
दरम्यान, यूपीआय ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही दिवसा किंवा रात्री कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता.
5 / 7
यूपीआयद्वारे तुम्ही एक बँक खाते एकाधिक यूपीआय अॅप्सशी लिंक करू शकता. तसेच, एका यूपीआय अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, यूपीआय आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही यूपीआय तुम्हाला मनी ट्रान्सफरची सुविधा देते.
6 / 7
हजारो फीचर फोन युजर्सना डिजिटल पेमेंट सिस्टममध्ये आणण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडे यूपीआयचे नवीन व्हर्जन UPI 123Pay आणले आहे.
7 / 7
नुकतेच यूपीआय सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड (Rupay Credit Card on UPI) सुरू करण्यात आले आहे. सध्या तुम्ही भीम (BHIM) अॅपवर काही बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड लिंक करू शकता.
टॅग्स :businessव्यवसायMONEYपैसा